नो निगेटिव्ह, नो एन्ट्री !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:06+5:302021-04-19T04:12:06+5:30
धारणी : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील भोकरबर्डी वनतपासणी नाक्यावर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशान्वये मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश ...
धारणी : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवरील भोकरबर्डी वनतपासणी नाक्यावर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या आदेशान्वये मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना बंदी घालण्यात आलेली आहे.
वनतपासणी नाक्यावर या कामाकरिता पोलीस कर्मचाऱ्यांसह विविध शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, भोकरबर्डी नाक्यावर प्रत्येक शिक्षकांची आठ तासांची ड्युटी लावण्याचे आदेश नुकतेच पारित करण्यात आले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या स्ट्रेनने घातक प्रभाव दाखविणे सुरू केला असून, अमरावती जिल्ह्यासह धारणी तालुक्यातील गावपातळीपर्यंत हा कोरोना विषाणू पोहोचला आहे. गावातील आजारी लोक उपचार घेण्यासाठी दवाखान्याऐवजी मोठ्या प्रमाणात भुमका आणि परिहारकडे जात असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाकर्दा या गावातील एक महिला अशाचप्रकारे उपचार न घेता तालुक्यातील जांबू या गावात भुमका परिहारकडे गेली असता, दोन दिवसांपूर्वी ती मृत पावल्याची घटना ताजीच आहे. सेमाडोहच्या घटनेप्रमाणेच ही घटनादेखील भुमका परिहारच्या नादी लागल्याने झाल्याचे समोर आले आहे.