कुणीही नाही राहणार उपाशी; शिधापत्रिकाधारकांना धान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:11 AM2021-05-29T04:11:04+5:302021-05-29T04:11:04+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; नियमित आणि मोफत कार्डधारकांना दिलासा अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना; नियमित आणि मोफत कार्डधारकांना दिलासा
अमरावती : कोरोनाच्या कालावधीत अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांच्या अन्नधान्याचा प्रश्न मिटविण्याकरिता कार्डधारकांना मोफत धान्य वाटपाची योजना सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात जिल्ह्यातील १९ लाख ४० हजार ५७८ इतक्या लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू व १० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड, तर प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो प्रतिलाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले जाणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या अंत्योदय व प्राधान्यक्रम कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण ५ किलो मोफत धान्य दिले जाणार आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील एकूण रेशन कार्डधारक
१९४०५७८
प्राधान्यगट- २८५७८२
अंत्योदय -१२१८४४
केसरी ८००२८
बॉक्स
काय मिळणार?
प्रतिमानसी
३ किलो गहू
२ किलो तांदूळ
बीपीएलच्या -२८५७८२
सदस्यांना लाभ
१)राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मे महिन्यात अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना २५ किलो गहू १० किलो तांदूळ अशी एकूण ३५ किलो धान्य प्रतिकार्ड
२)प्राधान्यक्रम कुटुंबे योजनेतील लाभार्थ्यांना ३ किलो गहू,२ किलो तांदूळ असे एकूण ५ किलोप्रति लाभार्थी याप्रमाणे मोफत धान्य वाटप केले आहे.
बॉक्स
केसरीच्या ४०६८५० लाभार्थ्यांना मिळणार लाभ
केसरीकार्ड असलेल्यांना देखील या योजनेत मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण आणि शहरी कार्डधारकांना लागू करण्यात आलेल्या उत्पन्नानुसार कार्डवरील धान्य उपलब्ध होत असते. कोरोनाच्या काळात मात्र आता सर्व कार्डधारकांना मोफत धान्य लाभ होणार आहे.
कोट
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मे २०२० च्या अन्नधान्याची मोफत वाटप करण्याच्या घोषणेनुसार. जिल्ह्यातील सुमारे १९ लाखावर लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे.
- अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी