‘नो पेन्डंसी’ला ‘अकाऊंट’चा हरताळ

By Admin | Published: April 11, 2017 12:29 AM2017-04-11T00:29:35+5:302017-04-11T00:29:35+5:30

आयुक्त हेमंत पवार यांच्या ‘मिशन तो पेन्डन्सी’ला लेखा विभागाने हरताळ फासला आहे.

'No penalty' account 'strike' | ‘नो पेन्डंसी’ला ‘अकाऊंट’चा हरताळ

‘नो पेन्डंसी’ला ‘अकाऊंट’चा हरताळ

googlenewsNext

त्रुट्यांची पळवाट : फाईलचा प्रवास अडखळत
अमरावती : आयुक्त हेमंत पवार यांच्या ‘मिशन तो पेन्डन्सी’ला लेखा विभागाने हरताळ फासला आहे. फाईल निकाली काढण्याबाबतचे आदेश जाणूनही आपल्याला लागूच नसावेत, अशा आविर्भावात लेखा विभागात फाईल्सचा प्रवास अडखळला आहे. प्रसंगी त्रुट्यांची पळवाट शोधत का होईना फाईल्सला लेखा विभागातून बाहेर पडायला महिन्याचा कालावधी लागतो. तब्बल महिने दीड महिने लेखा विभागात संबंधित फाईल्सवर किती उपचार केले जात असतील, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
आर्थिक व्यवहाराशी निगडित असलेला लेखाविभाग मागील काही काळांपसून बदनामीच्या दृष्टचक्रात अडकला आहे. ते दुष्टचक्र ‘प्रवाहाच्या उलट’ दिशेने न जाण्याचा सल्ला मिळत असल्याने हा विभाग प्रचंड चर्चेत असतो. महिना महिनाभर येऊन फाईल्स बाहेर पडत नसल्याने आयुक्तांनी फाईल्स संदर्भात काढलेले कार्यालयीन परिपत्रक या विभागाला लागू पडत नसावे, अशी परिस्थिती उद्भवली आहे.
कॅफोंनी मासिक ताळेबंदाला खो दिल्याने धनादश पडून राहायल्याचे निरीक्षण अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नोंदविले होते. याशिवाय १ मार्च २०१७ पासून महापालिकेतील संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्याच्या दृष्टीने आरटीजीएस प्रणाली अवलंबवावी, अशा सूचना होत्या. तथापि लेखा विभागात या आघाडीवर सामसूम आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य कसुरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०१७ ला आयुक्तांनी परिपत्रक काढले होते.
साधारणपणे कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याच्या टेबलवर सात कामाच्या दिवसाचे वा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही. तत्काळ आणि तातडीच्या स्वरुपाचे फाईली त्या प्रकरणाच्या निवडीनुसार शक्य तितक्या एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी आणि तातडीचे शक्यतो चार दिवसात निकालात निघावी, असे यात म्हटले होते. मात्र हे परिपत्रक लेखाविभागात पोहोचले नसावे की काय, अशी शंका येण्याइतपत येथे फाईलचा प्रवास रखडत रखडत सुरू आहे. (प्रतिनिधी)

म्हणूनच रखडतात फाईल्स
लेखा विभागामध्ये देयके सादर करताना विशिष्ट फाईल्सवर जाणून-बुजून त्रुट्या काढल्या जातात. अनेक फाईल्स अडकविल्या जात असल्याचा आरोप लेखा विभागावर होत आहे. त्यात किती तथ्य आहे हा संशोधनाचा विषय असला तरी फाईल्सचा प्रवास लांबविण्यासाठी ही पळवाट शोधली जात असल्याचे महापालिका वर्तुळात बोलले जात आहे.

Web Title: 'No penalty' account 'strike'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.