कोणतीच शाळा बंद करू नये, शिक्षक समिती आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:24 PM2018-03-05T22:24:38+5:302018-03-05T22:24:38+5:30
प्राथमिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असतांना कमी पटसंणख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट रचला जात असल्याचा....
आॅनलाईन लोकमत
अमरावती : प्राथमिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांच्या समस्या प्रलंबित असतांना कमी पटसंणख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट रचला जात असल्याचा जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केला व विविध मागण्यांचे निवेदन सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना दिले.
कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा.मोफत गणवेश वाटपातील अटी- शर्थी न्यायसंगत नाही, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात बालपणापासूनच भेदभाव व पक्षपातीपणाची भावना निर्माण होते. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत गणवेश योजनेत समावेश करावा. १९८२ मधील मूळ पेन्शन योजना व भविष्य निर्वाह योजना लागू करावी. सर्व शिक्षकांना एमएससीआयटी अर्हता धारण करण्याची मुदत २०१८ पर्यंत वाढवून द्यावी. शिक्षकांना आॅनलाईनच्या कामातून मुक्त करावे व शाळेत किमान केंद्रस्थळावर डाटा एंट्री आॅपरेटर आणि सर्व सुविधा मिळाव्यात आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्यात. यावेळी अशोक पारडे, गोकूलदास राऊत, जयकुमार कांडलकर, राजेश सावरकर, सदानंद रेवाळे आदी उपस्थित होते.