शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीकाठाने प्रवास, 70 वर्षात एसटी नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 02:58 PM2018-06-29T14:58:45+5:302018-06-29T15:00:08+5:30

सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे.

No travelling source for student in Tiwasa at Amarawati | शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीकाठाने प्रवास, 70 वर्षात एसटी नाही 

शिक्षणासाठी चिमुकल्यांचा नदीकाठाने प्रवास, 70 वर्षात एसटी नाही 

Next

मोहन राऊत / धामनगाव रेल्वे

अमरावती - यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण ते घेन्यासाठी आजही धडपड करावी लागते नदीच्या काठाने तब्बल साडेचार किलोमीटरचा दररोज प्रवास आहे.  सत्तर वर्षात तीन गावात एसटी पोहोचली नसल्याने त्यांच्या नशिबी ही पायपीठ नित्याची आहे. धामणगाव रेल्वे तालुक्याच्या टोकाला तिवसा तालुक्यातील पुनर्वसन असलेल्या आलवाडा, धारवाडा, दुर्गवाडा येथील तीन गावांची अवस्था गंभीर आहे येथील विद्यार्थ्यांना धामनगाव तालुक्यातील अंजनसीगी हे गाव शिक्षणासाठी जवळ असल्याने येथे तब्बल 40 विद्यार्थी दररोज येतात मागील 70 वर्षात या तिन्ही गावाने एस. टी. ची चाके पाहिली नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

संकटाचं व्यूहचक्र 
इयत्ता आठवी, नववी, दहावी शिक्षण घेणाऱ्या  सावित्रीच्या लेकींना दररोज सायकल ने तर कधी पायदळ पायपीट करावे लागते अकरा वाजता शाळेत पोहोचण्याकरिता सकाळी 9 वाजता घरून निघावं लागत शाळेमधून यायला रात्र होते. वर्धा नदीचा काठ व  निर्मनुष्य असलेल्या या रस्त्याने साप, विंचू असे दररोज संकटाचे चक्रव्यूह असल्याची कैफियत चिमुकले मांडतात 

शिक्षकांची तळमळ 
मागील वर्षी काही दिवस चादूर रेल्वे आगारांची एसटी येत होती. ती बस सुरू व्हावी म्हणून अंजनसिंगी येथील साईबाबा विद्यालयाचे मुख्याद्यापक सुभाष पुसदकर व  शिक्षक रवींद्र सोळंके यांची तळमळ पाहायला मिळते. परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिली त्यांच्या कार्यालयात चकरा मारणे सुरू आहे मात्र लालफीत शाहीवर कोणताच फरक पडत नसल्याचे दिसते

लोकप्रतिनिधीना जुमानत नाही अधिकारी 

आपल्या  मतदारसंघातील धरणग्रस्त गावात एसटी सुरू व्हावी म्हणून तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्वरीत परिवहन महामंडळाला पत्रव्यवहार केला फोनवरून संवाद साधला  येथील ग्रामस्थ अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या कडे  बस विषयी समस्या घेऊन गेले त्यांना   निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावर तात्काळ दखल घेत गोंडाणे यांनी चांदूर रेल्वे आगार प्रमुखांना लेखी पत्र दिले व बस चालू करण्या संदर्भात फोनवरून संवाद साधला.परंतू आजही एसटी सुरू झाली नाही .

Web Title: No travelling source for student in Tiwasa at Amarawati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.