राजकुमार पटेल, जयश्री देशमुख यांचे नामांकन वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:49+5:302021-09-18T04:14:49+5:30
अमरावती : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जयश्री देशमुख यांचे नामांकन जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणुकीत वैध ठरविण्याचा निर्णय ...
अमरावती : मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल व जयश्री देशमुख यांचे नामांकन जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणुकीत वैध ठरविण्याचा निर्णय सहकारी संस्थेचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दाभेराव यांनी शुक्रवारी घेतला. प्रतिवादींच्या सुनावणीनंतर याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. माजी महापौर प्रवीण काशीकर यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्या नामांकनावर आक्षेप घेतला होता. पटेल हे अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातून उमेदवार आहेत, तर जयश्री देशमुख यांनी महिला राखीव प्रवर्गातून नामांकन दाखल केले आहे. आमदार पटेल यांच्याकडून ॲड. किशोर शेळके व ए. एम. जामठेकर यांनी युक्तिवाद केला. आमदार पटेल यांची उमेदवारी ही राखीव मतदार संघातून आहे. त्यांनी सेवा सहकारी संस्था हे बँकेचे संचालक मंडळाकरिता नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही. त्यामुळे कलम ७३ (क) (अ) नुसार याप्रकरणी सहकारी संस्थांची नियमावली लागू होत नाही. महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक) नियम, २०१४ चे कलम २० (१) नुसार मतदार यादीत नाव समाविष्ट असेल तर ते निवडणुकीकरिता पात्र ठरेल, याआधारे आमदार राजकुमार पटेल याचे नामांकन वैध ठरविण्यात आले. त्यामुळे आता राखीव मतदारसंघात निवडणूक रंगणार आहे.