माजी आमदारासह सात जणांचे नामांकन दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:28 AM2021-09-02T04:28:30+5:302021-09-02T04:28:30+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच सहकार क्षेत्रातील रणधुमाळीला वेग आला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी १ सप्टेंबर ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच सहकार क्षेत्रातील रणधुमाळीला वेग आला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी १ सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्यासह अरुण गावंडे, मनीष कोरपे, अनिल जळमकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. बुधवारी ७१ जणांनी १०१ अर्ज उचलले. दोन दिवसांत १०४ जणांनी १९२ अर्जांची उचल केली आहे.
बँकेची तब्बल ११ वर्षांनंतर निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय नेत्यांमध्ये लगबग आहे. येत्या ४ ऑक्टोबर रोजी बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार निवडणुकरिता ३१ ऑगस्टपासून नामांकन अर्जांची उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ३३ जणांनी ९१, तर बुधवारी ७१ जणांनी १०१ अर्जांची उचल केली. पाच इच्छुकांनी आठ नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
बॉक्स
५, ६ सप्टेंबरला होणार गर्दी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३१ ते ६ सप्टेंबर या कालावधीत अर्ज उचलणे व दाखल करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशातच अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या टप्यात ५ व ६ सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये सर्वाधिक नामांंकन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.