तलाठ्यांचा शासनाशी असहकार

By admin | Published: September 10, 2015 12:10 AM2015-09-10T00:10:36+5:302015-09-10T00:10:36+5:30

शासनाचे आदेश, परिपत्रकाप्रमाणे संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ...

Non-cooperation with Takht's Government | तलाठ्यांचा शासनाशी असहकार

तलाठ्यांचा शासनाशी असहकार

Next


अमरावती : शासनाचे आदेश, परिपत्रकाप्रमाणे संबंधित अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केल्याने ग्रामीण महसुली कामकाज ठप्प पडले आहे.
सुवर्ण जयंती अभियानात सेवानिवृत्त प्रकरणे, सेवापुस्तके अद्ययावत करण्या संदर्भातील तलाठ्यांची कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत. दुष्काळ, गारपीट व अतिवृष्टी निधीवाटपाचा मेहनताना तहसीलदरांनी काढला. परंतु तलाठ्यांना दिलेला नाही. शासनाच्या २१ नोव्हेंबर २०१४ च्या निर्णयाप्रमाणे प्र्रमाणे १,२७५ रुपये प्रवासभत्ता देण्यात आलेला नाही, ज्येष्ठता यादी १ जानेवारी पासून प्रसिध्द केलेली नाही. मात्र, कनिष्ठ लिपिकांच्या अव्वल कारकुन पदावर पदोन्नती २ महिन्यांपूर्वीच केल्या आहेत. तसेच संगणकाच्या कामाकरिता ४ जून १९९८ नंतर वयाची ४५ वर्षे पूर्ण करणाऱ्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अद्याप आॅपरेटर मदतनीस दिलेला नाही. तलाठी कार्यालय मालकाला शासनाने भाडे मंजूर केले आहे. हे भाडे अद्यापही देण्यात आलेले नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिने उशिरा होते. आदी मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा अमरावतीव्दारा असहकार आंदोलन पुकारल्याचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मदापुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Non-cooperation with Takht's Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.