अंबानगरीत पत्रकारांचा मूकमोर्चा
By admin | Published: October 3, 2016 12:12 AM2016-10-03T00:12:49+5:302016-10-03T00:12:49+5:30
राज्यातील पत्रकारांवर रोेज होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामुळे पत्रकारांचे जीणे धोक्याचे झाले आहे
शेकडोंची उपस्थिती : पत्रकारांच्या सुरक्षेसाठी संरक्षण कायदा करण्याची मागणी
अमरावती : राज्यातील पत्रकारांवर रोेज होत असलेले हल्ले, खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न यामुळे पत्रकारांचे जीणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी विविध मागण्यांसंदर्भात रविवारी मराठी पत्रकार परिषद मुंबईव्दारा संलग्नित, अमरावती जिल्हा पत्रकार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांनी शातंतेच्या मार्गाने मूकमोर्चा काढून काळे कपडे परिधान करून व हाताला काळ्या फिती बांधून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधले.
हा मूकमोर्चा सकाळी ११ वाजता जयस्तंभ चौक, मार्ग इर्विन चौकात पोहोचला. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार्रापण करण्यात आले. यानंतर विविध मागण्यांचे फलक घेऊन सर्व सहभागी पत्रकार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.
पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनी पत्रकारांची मागणी त्वरित शासनाकडे पोहोचविण्यात येईल व मी यासंदर्भात स्वत: वरिष्ठांशी चर्चा करतो, असे आश्वासन दिले.
यावेळी आ. सुनील देशमुख, आ. रवि राणा, आ.अनिल बोंडे आदी उपस्थित होते.
भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेच संरक्षण कायदा करू, आणि ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देऊ, असे असे आश्वासन भाजपच्यावतीने नागपूर येथे पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने काढलेल्या मोर्चाच्या वेळी देण्यात आले होते. तो शब्द सरकारने पाळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.
या मोर्चात अनिल अग्रवाल, विलास मराठे, गणेश देशमुख, उल्हास मराठे, विजय ओडे, चंदू सोजतीया, त्रिदीप वानखडे, पद्मेश जयस्वाल, भारत थोरात, सुुनील धर्माळे, संजय बनारसे, चंद्रप्रकाश दुबे, सुरेंद्र चापोरकर, संजय मापले, पराग गनथडे, योगेश देवके, वैभव बाबरेकर, संदीप मानकर, जितेंद्र दखने, संजय शेंडे, यशपाल वरठे, चेतन ठाकूर, अरुण जोशी, मनीष तसरे, शाहीद खान, मनीष जगताप, बंडू नागरे, अक्षय नागपुरे, खोजया खुर्रम, सुनील तळोकार, महेश कथलकर, नयन मोंडे, नासीर हुसैन, यांच्यासह विविध वृत्तपत्र प्रतिनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रतिनिधी छायाचित्रकार व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. तसेच मोर्शी, धामणगाव, चांदूररेल्वे, चांदूरबाजार, परतवाडा, अंजनगाव सुर्जी, वरूड, तिवसा व भातकुली तालुक्यात मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
दर्यापुरातही मूकमोर्चा
दर्यापूरातही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी दर्यापूर पत्रकार संघ व प्रेस क्लबच्या वतीने मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार राहुल तायडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय कदम, शशांक देशपांडे, विजय बरगट, गजानन देशमुख, एस. एस. मोहोड, अनंत बोबडे, किरण होले, धंनजय धांडे, सचिन बोदळे, गजानन चौरपगार, सोपान गौंडचौर अजय शर्मा, रवि नवलकार उपस्थित होते.
नांदगाव खंडेश्वर
येथे मोर्चा
रविवारी विविध मागण्यासंदर्भात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातही मुक मोर्चा काढण्यात आला. येथील नांदगाव खंडेश्वर तालुका पत्रकार संघच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी नंदकिशोर इंगळे, मनोज मानतकर, अथर खान, श्याम शिंदे, संजय पोकळे, विशाल ढवळे, सुनील तायडे, भागवत ब्राम्हणवाडे, अरुण शिंदे, प्रदीप जोशी, विवेक पाठक, संजय जेवडे, विनेश बेलसरे, जितेंद्र आखरे, वासुदेव गावंडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.