गुणपत्रिकाच नाही; पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:23 AM2020-12-03T04:23:38+5:302020-12-03T04:23:38+5:30

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर ...

Not just grades; How to access a degree, postgraduate? | गुणपत्रिकाच नाही; पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश कसे?

गुणपत्रिकाच नाही; पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश कसे?

Next

‘विथहेल्ड’ निकालाने विद्यार्थी त्रस्त, विद्यापीठात गुणपत्रिकेसाठी गर्दी कायम

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुढील अभ्यासक्रमात प्रवेश कसा घ्यावा, ही चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे. काही महाविद्यालयाने प्रवेशाची अंतिम तारीख ४ डिसेंबर निश्चित केल्यामुळे विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेसाठी विद्यापीठात गर्दी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, विद्यापीठाने २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान अंतिम वर्षाच्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा पार पडल्या. ३ नोव्हेंबरपासून अंतिम वर्ष परीक्षांचे निकाल जाहीर केले जात आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम वर्ष वगळता अन्य सत्राच्या गुणपत्रिका व्यवस्थित आहे, अशा विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. परंतु, सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांचे निकाल अन्य सत्राच्या गुणपत्रिका विद्यापीठात प्राप्त नसल्याने निकाल ‘विथहेल्ड’ ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे महाविद्यालयांनी पदवी, पदव्युत्तर प्रवेशाची तारीख निश्चित केली आहे. गुणपत्रिकाच नसल्याने प्रवेश कसा मिळेल, ही माेठी समस्या हल्ली विद्यार्थ्यांपुढे उद्‌भवली आहे. महाविदयालय आणि विद्यापीठ यांच्यात समन्वयाचा अभाव नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या दूर करण्यासाठी तब्बल १५० ते २०० कि.मी. अंतर ओलांडून अमरावती विद्यापीठात यावे लागते, अशी कैफियत अनेक पालकांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली.

--------------------

जुने सत्राच्या गुणपत्रिका तपासूनच अंतिम वर्षाची गुणपत्रिका तयार करण्यात येते,

पदवीसाठी ग्रेड निश्चित करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मागील सत्राच्या गुणपत्रिका गोळा करण्यात येत आहे. कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणारा नाही.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

-----------------------

अमरावती विद्यापीठात १० वाजता पोहोचण्यासाठी घरून मुलींसोबत सकाळी ६ वाजता निघालो. खिडक्यांवर कर्मचाऱ्यांकडृून व्यवस्थित उत्तर मिळत नाही. काही मुली पालकांविना ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी आल्या आहेत. मुलींच्या अन्य सत्राच्या गुणपत्रिका जमा करूनही निकाल रोखला आहे.

- प्रमोद ठाकरे, पालक, देऊळगाव राजा

----------------

निकाल रोखण्यात आल्यामुळे पुढील प्रवेशापासून वंचित तर राहावे लागणार नाही ना, ही भीती आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांत समन्वयाचा अभाव आहे. सोबतच्या काही मित्रांचे प्रवेश झाले. त्यामुळे आता विद्यापीठाने प्रवेशास मुदतवाढ द्यावी.

- विश्वजित साेळंके, विद्यार्थी, विद्याभारती महाविद्यालय, अमरावती

Web Title: Not just grades; How to access a degree, postgraduate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.