पालकमंत्र्याना बदनाम करून गलिच्छ राजकारण करण्याची ही वेळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:13 AM2021-05-14T04:13:02+5:302021-05-14T04:13:02+5:30
अमरावती : रेमडीसिवरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.या प्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना साथीच्या ...
अमरावती : रेमडीसिवरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.या प्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कोरोना साथीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.असे असतांना भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी याचे राजकारण करीत सद्याच्या परिस्थितीकडे डोळझाक करून पालकमंत्री पर्यायाने कोरोना काळात अविरत सेवा देणाऱ्या प्रशासनालाच बदनाम करीत गलीच्छ राजकारण सुरू केली आहे.ही राजकारण करण्याची नाही.जनतेची दिशाभूल करणे बंद करण्याचा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपला दिला आहे.
देशात सध्या कोरोनाचो रूग्ण दिवसेदिवस वाढत आहेत.त्यापेक्षाही राज्यात परिस्थिती गंभिर असतांना या परिस्थितीला सामोरे जावून राज्य सरकारने तमाम जनतेच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेत आहे.कोरोना संकटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द आहे.सध्या कोरोना संक्रमन रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊव व संचारबंदी लागू केली आहे.या काळात सरकारने विविध घटकांनाही अनुदनाच्या माध्यमातून तसेच योजनाव्दारे मदतीचा हात दिला आहे.कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री व प्रशासन सातत्याने नियोजन करून यावर उपाययोजना करत आहे. त्यामुळे परिस्थितीही नियंत्रणात असून याच ठिकाणी नागपूर,मध्यप्रदेश,यवतमाळ,वाशिम व अन्य जिल्ह्यासोबतच जिल्ह्यातील रूग्णांवर उपाचार करीत आहे.असे असताना तिवसा येथील रूग्णालयातील रेमटीसिवरच्या विषयावर पालकमंत्र्याना बदनाम करण्याचे काम भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. भाजपच्या जिल्हाध्यक्षा,निवेदिता चौधरी व प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी पालकमंत्र्यांवर दिशाभूल करणारे आरोप केले आहेत.सदरचे आरोप तथ्यहीन असून जनतेची दिशाभूल करणारे आहेत.भाजपाने रेमडीसीवरच्या मुद्यावर काही संबंध नसतांना राजकारण करून पालकमंत्री व कॉंग्रेसला बदनाम करू नये अन्यथा आम्हीही सडेतोड उत्तर देवू असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख,माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले आदींनी दिला आहे.