शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:11+5:302021-07-31T04:14:11+5:30
अमरावती : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सेंटर ऑफ इंडियन ...
अमरावती : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)च्या नेतृत्वात आयोजित आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्याच्या प्रमुख मागण्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात आहाराचे पैसे न टाकता शाळेतून शिजविलेला ताजा आहार द्यावा आणि डीबीटी योजना रद्द करावी. सेंट्रल किचन पद्धतीचे धोरण मागे घ्यावे. शालेय पोषण आहार कामगारांना कामगाराचा दर्जा देऊन शासकीय सेवेत सामावून घ्यावे. तोपर्यंत शालेय पोषण आहार कामकागारांना १८ हजार रुपये मानधन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी या कर्मचारी आंदोलन केले. आंदोलनात सुभाष पांडे, महादेव गारपवार, दिलीप शापामोहन, रमेश सोनुले, श्याम शिंदे, पुंडलिक पापणकर, सुशीला सावलीकर, चंदा बारसे, संगीता लांडगे, सिंधू राठोड, मंदा नरजधने, सारीका घोरपडे, संगीता चौधरी, चंदा पंडागडे, सारिका कुकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.