दुबार नावे असलेल्या ४३ हजार मतदारांना नोटीस

By admin | Published: September 8, 2015 12:05 AM2015-09-08T00:05:24+5:302015-09-08T00:05:24+5:30

मतदार यादीत दुबार व तिबार नावे असलेल्या जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ४३ हजार ३६८ मतदारांना नावे कमी करण्यासाठी ..

Notice to 43 thousands of duplicate voters | दुबार नावे असलेल्या ४३ हजार मतदारांना नोटीस

दुबार नावे असलेल्या ४३ हजार मतदारांना नोटीस

Next

अद्ययावतीकरण मोहीम : खुुलासा मागविला
अमरावती : मतदार यादीत दुबार व तिबार नावे असलेल्या जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ४३ हजार ३६८ मतदारांना नावे कमी करण्यासाठी निवडणूक विभागाने नोटीस बजावल्या असून याबाबत आठवडाभरात खुलासा मागविला आहे. मतदारांनी मतदार नोंदणी करताना स्थानिक स्तरावर दुबार-तिबार नावे नोंदविल्याचे जिल्हा निवडणूक विभागाने राबविलेल्या मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेदरम्यान स्पष्ट झाले.
मतदारांना मागविला खुलासा
अमरावती : दुबार आणि तिबार नावे वगळून ती एकदाच मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. संबंधित मतदारांना त्यांचे नाव कुठे ठेवायचे आहे, याबाबत लेखी खुलासा निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सादर करायचा आहे. याबाबत संबंधित मतदारांना नोटीस बजावून आठवडाभरात खुलासा मागविण्यात आला आहे. मतदारयादीत दुबार व तिबार नावे असलेल्या मतदारांची संख्या आठ विधानसभा मतदारसंघात ४३ हजार ३६८ आहे. मतदारांकडून खुलासा मागविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Notice to 43 thousands of duplicate voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.