दोन्ही अधिष्ठातांना पोलिसांकडून नोटीस
By admin | Published: April 25, 2015 12:16 AM2015-04-25T00:16:15+5:302015-04-25T00:16:15+5:30
येथील शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदाचे रुजू नाट्य अद्यापही सुरुच आहे.
शांतता राखण्याचे आदेश : डीन पदाचे नाट्य संपता संपेना
अमरावती : येथील शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदाचे रुजू नाट्य अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी दोन्ही अधिष्ठातांसह संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही अधिष्ठातांना कायद्या व सुव्यवस्था अबाधिततेची नोटीस बजावली आहे.
विद्यापीठाने शिवाजी संस्थेला ३० दिवसांच्या आत अहवाल मागितला होता. मात्र, त्यांनी अहवाल दिला नाही. त्यामुळे दोन्ही अधिष्ठातांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी शुक्रवारी बोलाविण्यात आले. पीडीएमसीचे अधिष्ठाता दिलीप जाणे व माजी अधिष्ठाता पदमाकर सोमवंशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उध्दव देशमुख, श्रीरंग ढोले, विधी तज्ज्ञ अथर शमीम यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिष्ठातांनी त्यांची बाजू मांडली. सोमवंशीनी विद्यापीठाचा आदेश दाखविला तर, जाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकेचा हवाला दिला. तसेच जाणे यांनाही पोलीस संक्षणाची मागणी केली आहे. ( प्रतिनिधी)