कारागृहातील गांजाप्रकरणात चार जणांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:44 PM2018-07-28T22:44:28+5:302018-07-28T22:44:49+5:30
मध्यवर्ती कारागृहातील गांजा प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी उपअधीक्षकांसह चौघांना नोटीस बजावून प्रकरणाविषयीची माहिती व दस्तऐवज मागविले आहे. कारागृह प्रशासनाकडूनही गांजा आढळल्याच्या प्रकरणात चौकशी केली असून तो अहवाल महानिरीक्षकांना पाठविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
Next
ठळक मुद्देकारागृह प्रशासनाकडूनही चौकशी : बंद्यांचे बयाण नोंदविले
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यवर्ती कारागृहातील गांजा प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी उपअधीक्षकांसह चौघांना नोटीस बजावून प्रकरणाविषयीची माहिती व दस्तऐवज मागविले आहे. कारागृह प्रशासनाकडूनही गांजा आढळल्याच्या प्रकरणात चौकशी केली असून तो अहवाल महानिरीक्षकांना पाठविला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
अमरावती मध्यवर्ती कारागृहातील धान्य गोदामात चनाडाळीच्या पोत्यात गांज्याच्या पुड्या आढळल्या. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कडेकोट बंदोबस्त असताना कारागृहात गांजा पोहोचला कसा, यावर पोलीस खल करीत आहे. त्याअनुषंगाने फे्रजरपुरा पोलिसांनी कसून चौकशी करीत असून पोलिसांनी काही बंद्याचे बयाण नोंदविले आहे. पोलिसांनी धान्य पुरवठा करणारे व्यापारी मुतंजर अली मुज्जफर अली (रा.विद्यापीठ रोड), केळ व अंडे पुरवठा करणारा व्यापारी मो. फारूख मो. हन्नू (रा.अन्सारनगर) यांना नोटीस बजावून धान्य पुरवठ्याबाबतचे सर्व दस्ताऐवज मागविले आहे. सोबतच उपअधीक्षक गायकवाड यांनाही माहिती मागविली आहे. सोबतच त्यांचे रायटर तथा जेल रक्षक बेले व वाघडोळे यांना नोटीस बजावून माहिती मागविली आहे. धान्य, केळी व अंडा पुरवठादारस, उपअधीक्षक व रक्षक यांचे बयाण फ्रेजरपुरा पोलीस शनिवारी नोंदविणार होते.