राज्याचे प्रधान सचिव, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनजाती आयोगाची नोटीस

By गणेश वासनिक | Published: August 9, 2023 08:52 PM2023-08-09T20:52:06+5:302023-08-09T20:52:12+5:30

जिल्हा परिषदेत १०० बिंदू रोस्टर नाही; महिला कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

Notice of National Tribal Commission to Principal Secretary of State, District Collector of Pune | राज्याचे प्रधान सचिव, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनजाती आयोगाची नोटीस

राज्याचे प्रधान सचिव, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय जनजाती आयोगाची नोटीस

googlenewsNext

अमरावती: पुणे जिल्हा परिषदेत १९९७ पासून ते २०१३ पर्यंत १०० बिंदूनामावलीनुसार रोस्टरच नाहीत. सेवाज्येष्ठता यादी क्रमानुसार रोस्टर आहे. त्यामुळे आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले, ही बाब माहिती अधिकारातून पुढे आली आहे. आदिवासी कर्मचाऱ्यांची १०० बिंदूनामावली तयार करणे आणि तपासणी करणे, याकामी पुणे जिल्हा परिषदेत कुचराई झाल्यामुळे राष्ट्रीय जनजाती आयोगाने आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव आणि पुणे जिल्हाधिकारी यांना कलम ३३८ (अ) नुसार नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या आदिवासी महिला कर्मचाऱ्याचे नाव सुरेखा तारडे (वरिष्ठ सहायक) असे आहे. त्यांची मूळ नेमणूक जानेवारी १९९९ मधील आहे. २५ वर्षांत त्यांना एकदाच पदोन्नती मिळाली. मात्र एकाच आदेशातील २ गैरआदिवासी कर्मचारी आदिवासी आरक्षणाचा लाभ घेऊन त्यांना १९९९ ते २०२१ पर्यंत तीनदा पदोन्नती मिळाली. ५ गैरआदिवासी कर्मचाऱ्यांची नेमणूक आदिवासींच्या राखीव जागेवर केल्यामुळे खरे असलेले पाच आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय जनजाती आयोगाकडे तक्रार केली आहे.

१०० बिंदूनामावली तयार केली नाही आणि रोस्टर हे सेवाज्येष्ठता यादी क्रमानुसार असल्यामुळे सहायक आयुक्त (मावक) यांनी २ सप्टेंबर २०११ रोजी सेवाज्येष्ठता यादीवरून नोंद अनुक्रमे असलेल्या रोस्टरची तपासणी केली होती. त्याच सहायक आयुक्त (मावक) यांनी पूर्वी केलेली रोस्टर तपासणीतील स्वतःची चूक लक्षात आल्यावर स्वतःच्या बचावासाठी बिंदूवर नोंदी घेऊन चूक सुधारली अन् २ जानेवारी २०१३ रोजी १०० बिंदूनामावलीची तपासणी केली. परंतु सेवाज्येष्ठता क्रमाने रोस्टर नोंद केल्याने आदिवासी कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले.

गेल्या चार दशकांपासून अनुसूचित जमातींच्या राखीव जागा गैरआदिवासींनी बळकावलेल्या आहेत. या जागा रिक्त करण्याबाबत शासनाचे वेळोवेळी आदेश आहे. परंतु बळकावलेले अनुसूचित जमातीचे बिंदू रिकामे केले नाहीत. आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे.- ॲड. प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम महाराष्ट्र.

Web Title: Notice of National Tribal Commission to Principal Secretary of State, District Collector of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.