जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयास जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:00 AM2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:51+5:30

अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोटीस बजावण्यात येत आहेत.

Notice of Seizure to the Office of the Collector, Divisional Commissioner | जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयास जप्तीची नोटीस

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयास जप्तीची नोटीस

Next
ठळक मुद्देमहापालिकेचा बडगा । शासकीय विभागांकडे अडीच कोटींचा मालमत्ता कर थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयांसह अनेक कार्यालयांकडे अडीच कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी असल्याने महापालिकेने आता बडगा उगारत जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष संपायला एक महिना अवधी असताना १७ कोटींच्या थकबाकीपैकी अधिकाधिक वसुली करण्यासाठी महापालिकेचा करवसुली विभाग कामाला लागला आहे.
अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोटीस बजावण्यात येत आहेत. झोन क्रमांक १ मध्ये सद्यस्थितीत ७३ लाख १४ हजार ७३८ रुपयांची वसुली बाकी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय १,४५,७०२, नियोजन भवन ५,६६,५३७, विभागीय आयुक्त बंगला १६,०७४, अप्पर जिल्हाधिकारी बंगला ११,४२०, बचत भवन ३२,५१७, तालुका फळरोपवाटिका ६४,१३०, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय २९,८८७, कार्यकारी अभियंता (आदिवासी विभाग) ३२,७५२, बी अँड सी वर्कशॉप १,५७,०००, टेलिकॉम कॉलनी ५,७७,५५७, बीएसएनएल मोबाइल टॉवर १,१७,०८८, पशुसंवर्धन उपसंचालक कार्यालय १,१५,३५९, पशुधन विकास अधिकारी १२,०६४, महवितरण उपकेंद्र ९,९४,२५४, महावितरण नवसारी उपकेंद्र ८,३५,४५२, राजेंद्र काकडे (मोबाइल टॉवर) २,०२,२६९, करिअर मार्गदर्शक केंद्र १३,२८७, तालुका निरीक्षक भूमिअभिलेख ८९,३३४, व १,२१,२०७, शासकीय तंत्रनिकेतन ६२,३१८, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय १,००,९८४, जिल्हा स्त्री रुग्णालय हिवताप १२,०३,१५४, कुष्ठरोग १२,०४,३९८, जिल्हा क्रीडा अधिकारी २२,१०८ व ३,४३,९०९ रुपये असे बडे थकबाकीदार आहेत. झोन क्रमांक ५ मध्ये नागपुरी गेट पोलीस ठाणे व निवासस्थाने २३,८२,७६६, खोलापुरी गेट पोलीस स्टेशन २१,८०५ व खोलापूरी गेट पोलीस स्टेशन, जुनी कोतवाली भाजीबाजार ६६,७७८ रुपये अशी कर थकबाकी आहे.

बीएसएनएलकडे १० लाखांची थकबाकी
झोन २ मध्ये १.४५ कोटींची थकबाकी आहे. यामध्ये बीएसनएलकडे ५,४५,६६४, व ५,००,२७८, भातकुली तहसील कार्यालय २,४५,५८०, राज्य माहिती आयुक्त कार्यालय ६५,५९५, समाजकल्याण विभाग १,०१,७८२, मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह १,१७,०३७, जिल्हा सत्र न्यायालय (नवीन) १८,००,७९१, विभागीय आयुक्त कार्यालय ४८,२८,४३८, शहर पोलीस निवास १२,०७,७८७, सिटी कोतवाली २,७८,५३९, महाराष्ट्र शासन (महसूल विभाग) १,३६,३४६, तहसील कार्यालयाकडे ३,५३,१६० रुपयांची थकबाकी आहे.

१७ कोटींची वसुली बाकी
महापालिका हद्दीत ४३,४३,५०,०२० कोटींची करमागणी आहे. या तुलनेत सद्यस्थितीत २६,४३,१९,८९६ कोटींची वसुली करण्यात आली व १७ कोटींची वसुली बाकी आहे. झोन १ मध्ये ३,६५,५०,७१७, झोन २ मध्ये ५,३९,५१, ५५२, झोन ३ मध्ये १,४७,५४,०१९, झोन ४ मध्ये ४,९३,१४,१४७ व झोन क्रमांक ५ मध्ये १,५४,५९,८६९ रुपयांची वसुली बाकी आहे.

Web Title: Notice of Seizure to the Office of the Collector, Divisional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.