कुख्यात संतोष आंबेकरची अमरावती न्यायालयात पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 06:00 AM2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:29+5:30
संतोष आंबेकर हा २००५-०६ च्या दरम्यान जन्मठेपेची शिक्षा नागपूर मध्यवर्ती कारागृहात भोगत असताना अकोला येथील कारागृहात त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यादरम्यान त्याला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची संचित रजा मंजूर केली होती. तो संचित रजेवर बाहेर आला असताना ती रजा वाढवून देण्यासाठी त्याने अमरावती येथील डॉक्टर दिवाण यांच्याकडून त्याची पत्नी आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले आणि रजा वाढविण्यासाठी त्याचा वापर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कारागृहाला खोेटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आरोपी असलेला नागपूरचा कुख्यात गुन्हेगार संतोष आंबेकर याला पोलिसांनी गुरुवारी अमरावती न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालय परिसरात नागपूर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
संतोष आंबेकर हा २००५-०६ च्या दरम्यान जन्मठेपेची शिक्षा नागपूर मध्यवर्ती कारागृहात भोगत असताना अकोला येथील कारागृहात त्याचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यादरम्यान त्याला उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची संचित रजा मंजूर केली होती. तो संचित रजेवर बाहेर आला असताना ती रजा वाढवून देण्यासाठी त्याने अमरावती येथील डॉक्टर दिवाण यांच्याकडून त्याची पत्नी आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले आणि रजा वाढविण्यासाठी त्याचा वापर केला. नागपूर कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ते प्रमाणपत्र सादर सादर केले होते. मात्र, नागपूर कारागृहाने तो अर्ज अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना पाठवून सदर वैद्यकीय प्रमाणपत्राची सत्यता पडताळण्याबाबत सूचविले होते. परंतु, प्रमाणपत्रावरील जिल्हा शल्यचिकित्सक यांची स्वाक्षरी वेगळी असल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांनी कारागृह अधीक्षक यांना सादर केला होता. त्यानुसार संतोष आंबेकरविरूद्ध शहर कोतवाली ठाण्यात कलम ४२०, ४६८ नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्याबाबतचा तपास करून २००६ मध्ये पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्याप्रकरणी गुरुवारी दुपारी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात संतोषला हजर करण्यात आले. संतोष आंबेकर हा नागूपर कारागृहात संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत न्यायालयीन बंदी आहे. अमरावती येथील या प्रकरणात तक्रारदार म्हणून दाबेराव, तपास अधिकारी नवले व आत्राम यांची साक्ष न्यायालयाने गुरुवारी नोंदविली. संतोषच्या बाजूने पंकज ताम्हणे, राजू गुप्ता, गायत्री दाणी या वकीलत्रयींनी काम पाहिले.