'नरेगा'मध्ये आता ११ कलमी कार्यक्रम

By admin | Published: August 18, 2016 12:07 AM2016-08-18T00:07:46+5:302016-08-18T00:07:46+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आता ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

Now 11-point program in 'NREGA' | 'नरेगा'मध्ये आता ११ कलमी कार्यक्रम

'नरेगा'मध्ये आता ११ कलमी कार्यक्रम

Next

 वैयक्तिक लाभाच्या योजना : आराखड्यास ग्रामसभेची मंजुरी अनिवार्य
अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आता ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमातील कामांच्या आराखड्यास १५ आॅगस्टच्या ग्रामसेवक मंजूरी देण्यात आलेली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्यासाठी आता ११ कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमातील कामांच्या आराखड्यास १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत मंजूरी प्रदान करण्यात आली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) अंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या माध्यमातून कायमस्वरुपी मजूरीवर अवलंबून न राहता सक्षमपणे स्वाभिमानी जीवन जगणे आणि सर्वांगीण विकास करण्यास वाव आहे. परंतु वेगवेगळ्या कारणामुळे हे काम करणे फारसे शक्य झाले नाही तर योजने अंतर्गत मोहित स्वरुपात कामे पूर्ण करण्यात आली नसल्याने काम अपूर्ण राहणे आणि त्यामुळे कामांच्या किंमतीत वाढ होणे अश्या बाबी शासनाच्या निदर्शनात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योजना मंजूरी देण्यापूर्वी सिमीत न ठेवता, त्याद्वारे वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत सन २०१६-१७ पासून कामांना ११ कलमी कलमी कार्यक्रम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. यासंबंधी राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत ४ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि संंबंधित कार्यालयांना परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार ‘नरेगा’ अंतर्गत यापूर्वीपासून राबविण्यात येणाऱ्या कामांच्या ११ कलमी कार्यक्रमातील कामांच्या पूरक आराखड्यास ग्रामसभेची मंजूरी घेण्यात येणार आहे. पूरक आराखड्यासह सन २०१७-१८ या वर्षीच्या रोहयो कामांचा समावेश करण्यात येणार आहे.

पूरक आराखड्यांचे नियोजन
‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ११ कलमी कार्यक्रमात सन २०१६-२०१७ या वर्षात करावयाच्या कामाचे पूरक आराखडे तयार करण्याचे नियोजन विभागातील पाचही जिल्ह्यात करण्यात येत आहे. कामांचे गावनिहाय आराखडे करुन या आराखड्यांना १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये मंजूरी घेण्यात येणार आहे.

कार्यक्रमात या कामांचा समावेश
सिंचन विहीरी, शेततवे, व्हर्मा कंपोस्टिंग,नाफेड कंपोस्टिंग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गाव तलाब, पारंपारिक पाणी साठ्याचे नूतनीकरण व गाळ काढणे जलसंधारणााची कामे, रोपांची निर्मिती, वृक्ष लागवड- संगोपन व संरक्षण, क्रीड़ांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमि, शुशोभीकरण, ग्राम पंचायत भवन, गावाअंतर्गत रस्ते, घरकुल, गरांचा गोठा, कुकुटपालन शेड, शेळीपालन शेड, मत्स्य व्यवसाय ओटे इत्यादी कामांचा समावेश आहे.

Web Title: Now 11-point program in 'NREGA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.