लग्नसमारंभासाठी आता ५० व्यक्तींना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:14 AM2021-03-27T04:14:03+5:302021-03-27T04:14:03+5:30

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार लग्नसमारंभाला २५ जणांची उपस्थितीची घातलेली मर्यादा वाढवून ५० केली आहे. त्यामुळे वर, वधू, ...

Now 50 people are allowed for the wedding | लग्नसमारंभासाठी आता ५० व्यक्तींना परवानगी

लग्नसमारंभासाठी आता ५० व्यक्तींना परवानगी

Next

अमरावती : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेनुसार लग्नसमारंभाला २५ जणांची उपस्थितीची घातलेली मर्यादा वाढवून ५० केली आहे. त्यामुळे वर, वधू, नातेवाईक, भटजी, आचारी व वाजंत्री आदीं मिळून ५० व्यक्तींना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येईल. त्याशिवाय, विनावातानुकूलित मंगल कार्यालये, सभागृहांमध्ये लग्नसमारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केलेत.

आता सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत लग्नसमारंभ आयोजित करता येईल. लग्नसमारंभ वर किंवा वधूचे घर, त्याचप्रमाणे, नॉन एसी मंगल कार्यालये, खुले लॉन, सभागृहात करता येईल. मात्र, एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ ५० व्यक्तीच उपस्थित असतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्नस्थळीच वाद्य वाजविण्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे, त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

बॉक्स

लेखी स्वरूपात परवानगी आवश्यक

लग्नसमारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित उपस्थित व्यक्तींच्या यादी सादर करून लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधीकाऱ्यांनी दिले आहेत.

Web Title: Now 50 people are allowed for the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.