आता महाविद्यालयांचे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:02+5:302021-01-14T04:12:02+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ३८४ महाविद्यालयांचे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण केले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ...

Now the ‘academic’ audit of colleges | आता महाविद्यालयांचे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण

आता महाविद्यालयांचे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित ३८४ महाविद्यालयांचे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण केले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर हार्ड कॉपी दोन प्रतीत मूळ शुल्क पावतीसह २१ जानेवारीपर्यंत महाविद्यालयीन विभागात सादर करावे लागेल. लेखा परीक्षण नसल्यास संलग्निकरण नाही, असा पवित्रा विद्यापीठाने घेतला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ मधील कलम ३७ (१) (ट) प्रमाणे विद्याविषयक लेखा परीक्षणाच्या माध्यमातून महाविद्यालयांचे संलग्निकरणात वाढ करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठद्धारा विद्याविषयक लेखा परीक्षण मानके, कार्यप्रणाली तयार केली असून, विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने त्याला मान्यता प्रदान केली आहे. निदेश क्रमांक १६/२०२० नुसार १२ ऑक्टोबर २०२० निर्गमित करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०२१-२२ पासून महाविद्यालयांच्या संलग्निकरण वाढीकरिता अर्ज सादर करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्या महाविद्यालयांचे विषय, अभ्यासक्रम व विद्याशाखेचे संलग्निकरण संपलेले आहे, अशा महाविद्यालयांनी सत्र २०२१-२२ पासून विद्याविषयक लेखा परीक्षणाच्या माध्यमातून महाविद्यालयांचे संलग्निकरण करावयाचे आहे. याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

------------------

कोट

नवा विद्यापीठ कायदा आणि यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालयांत सोईसुुविधा, शैक्षणिक बाबींची पूर्तता झाली अथवा नाही, हे लेखा परीक्षणातून निश्चित होणार आहे. मार्क बेस प्रणालीद्धारे ‘ॲकेडमिक’ लेखा परीक्षण होईल.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

Web Title: Now the ‘academic’ audit of colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.