आता बांबू गार्डन यू-ट्यूबवर उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:36 PM2018-07-16T22:36:03+5:302018-07-16T22:36:32+5:30
राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्याच्या वनविभागात नावलौकिक मिळविणारे येथील बांबू गार्डन यू-ट्यूब झळकत आहे. या गार्डनमध्ये असलेल्या बांबूच्या दुर्मिळ आणि मौल्यवान ६३ प्रजातींची माहिती सहजतेने उपलब्ध आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर बांबू गार्डनबाबत इत्थंभूत माहिती मिळणे सुकर झाले आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात साकारलेल्या बांबू गार्डनला भेट देणाऱ्यांमध्ये पर्यटक, निसर्गप्रेमींची संख्या दरदिवसाला वाढत आहे. या गार्डनमध्ये जतन केलेल्या बांबू प्रजातीविषयीची माहिती ही सर्वदूर पोहोचवावी, यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी बांबू गार्डन यू-ट्यूबवर अपलोड केले. त्यावर बांबू प्रजाती, महत्त्व, रोजगारभिमुख उपक्रम सहजतेने झकळत आहेत. बांबूपासून रोजगार निर्मिती कशी होते, याचे सचित्र प्रात्यक्षिकदेखील लक्ष वेधणारे आहे. जगभरात विखुरलेल्या अमरावतीकरांना ही नवलाई वनविभागाने उपलब्ध केली आहे.
अमरावतीची बांबू रोपे विशाखापट्टणमला
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या कोटापल्ली जी. माडुगुला मंडळ येथे बांबू गार्डन वॉटर फॉल साकारले जात आहे. त्याकरिता अमरावतीच्या बांबू गार्डनमधून ११ जुलै रोजी ३३५ रोपे विशाखापट्टणम येथे पाठविण्यात आली. रोपे विक्रीतून वनविभागाला ३३ हजार ५०० रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
बांबू गार्डनमध्ये या आहेत ६३ प्रजाती
बांबू गार्डनमध्ये बांबुसा एफेनिस, बांबुसा असामिका, बांबूसा बालकुआ, बांबूसा बांबोस, बांबूसा बांबोस व्हर गिगँटिया, बांबूसा बर्मानिका, बांबूसा चर्चनिस, जेनटेनिया, लॉगीसपिकुलता, बांबूसा मल्टिप्लेक्स, मल्टिप्लेक्स अल्फोनिस कार, बांबूसा नाना, बांबूसा नुटन्स, ओलीव्हरना, पालीडा, पॉलिमोरफा, बांबूसा स्ट्रीटा, बांबूसा टेरस, टलडा, टलडा वार स्ट्रीटा, व्हेंट्रिइकोसा केमेई, बांबूसा विलगरीस, बांबूसा वामिंग, डेंड्रोकलम अस्पर, बॅन्डेसी, कॅलोस्ट्याचूझ, जिग्नॅटस, हॅमीलटोनी, लॉझीसपॅथ्यूस, मेम्रानॅक्यूज, सिक्कीमेनीज, सोमदेवई, स्ट्रीच्यूज, डिनोच्यूहिया अंदमानिका, मालकेनांदी, अॅट्रोफिलोकिया, गिगांटोचिआ अॅटर, मायक्रोट्याच्या, रोस्ट्राटा, गौडुआ अॅग्न्युस्टिफोनिया, मेवकन्ना बॅकिफेरा, अवचीएन्ड्रा इब्रास्केटा, स्प्रिक्टोरिया, ट्रॅवनकोरिया, आॅक्सनथेरा अबॅक्सिनिका, पारव्ही पोलिया, फिलीओस्टॅच असामिका, अॅरीया, अॅड्यूलिस, मान्नी, निग्रा, स्पेसूडोसा अॅपोनिका, स्पेसूडॉक्सी पेन्याथेरिया निचे, टॉकसी, सासाफार्च्युनिंग, किझोटॅक्च्युमल ब्रॅच्यूकॅडम, डिलुआ, प्रेगासीम, पॉलिमारुथम, स्ट्रीबाटिया चॅयनिज, थ्रॅसोट्याचूझ आॅलिव्हरी अशा बांबूच्या ६३ प्रजाती आहेत.