आता एसटीतही सीसीटीव्ही कॅमेरे

By admin | Published: June 9, 2014 11:19 PM2014-06-09T23:19:42+5:302014-06-09T23:19:42+5:30

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.

Now CCTV Cameras in ST | आता एसटीतही सीसीटीव्ही कॅमेरे

आता एसटीतही सीसीटीव्ही कॅमेरे

Next

प्रस्ताव विचाराधीन : प्रवासी, कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना
गणेश वासनिक - अमरावती
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये कर्मचारी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत शासन विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय लवकरच होणार आहे.
गत आठवड्यात कल्याण येथे महिला वाहकांसोबत झालेली मारहाणीची घटना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजली.  यावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली. अखेर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी बसेसमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी शासन विचार करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये लवकरच कॅमेरे लावले जाण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून नावारुपास आलेल्या एसटीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कधी  नफ्यात तर कधी तोट्यात, तरीही एसटीचा प्रवास अविरतपणे सुरू आहे. एसटी डबघाईस येण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचल्यानंतरही  प्रवाशांनी दाखविलेल्या विश्‍वासावरच ती गावखेडे, दर्‍या-खोर्‍यांत पोहोचल्याचे चित्र आहे. मात्र, अलिकडे एस.टी.मध्ये सातत्याने घडणार्‍या दुर्दैवी घटनांमुळे राज्य परिवहन महामंडळावर नामुष्की ओढवली आहे. महिला वाहक आणि कर्मचार्‍यांसोबत प्रवाशांचे वाद, त्यातून निर्माण होणार्‍या अप्रिय घटनांमुळे कर्मचारी हतबल झाले आहेत. खिसेकापुंचा सुळसुळाट, चेन स्नॅचिंग, बॅगा लंपास करणे आदी घटनांपुढे आता महामंडळानेही हात टेकले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकावर पोलीस चौकी असते. मात्र, धावत्या बसमध्ये अप्रिय घटना घडल्यास   उपाययोजनेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Web Title: Now CCTV Cameras in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.