आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

By admin | Published: November 2, 2015 12:29 AM2015-11-02T00:29:43+5:302015-11-02T00:29:43+5:30

गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे.

Now, e-rickshaw will pick up litter of garlic | आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

आता ‘ई-रिक्षा’ने गल्लीबोळातील कचरा उचलणार

Next

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल : नगरसेवक प्रदीप हिवसे यांचा पुढाकार
अमरावती : गल्लीबोळातून घंटी कटल्याद्वारे कचरा उचलण्याच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत आता महानगरातील कचरा ‘ई-रिक्षा’ने उचलला जाणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमात समावेश झाल्यानंतर कचरा उचलण्याची ‘स्मार्ट’ प्रणाली नगरसेवक प्रदीप हिवसे यांच्या पुढाकाराने समोर आली आहे. प्रदूषणमुक्त ‘ई-रिक्षा’ला आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनीदेखील संमती दर्शविली आहे.
महानगरात कचरा उचलणे, वहन करणे, कम्पोस्ट डेपोवर पोहचविणे आदी बाबी आरोग्य विभागाच्या देखरेखीत सुरु आहे. गल्लीबोळातून घराघरातून निघणारा कचरा हा घंटी कटल्याद्वारे गोळा केला जातो. ही व्यवस्था ४३ प्रभागातही सुरू आहे. घंटी कटल्याचे व्यवस्थापन हे सफाई कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले आहे. मात्र घंटी कटल्यातून वहन होणारा कचरा ठिकठिकाणी रस्त्यावर पडत असल्याचे चित्र आहे. घंटी कटल्याला साजेसे पण कमी वेळेत जास्त काम होण्याची हमी असलेला ‘ई-रिक्षा’ने कचरा उचलण्याची प्रणाली सुरु केल्यास ती सुकर होईल.
‘ई- रिक्शा’ हा बॅटरीवर चालणारा असून शासनाने मान्यता प्राप्त केल्याची बाब नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी आयुक्तांचा लक्षात आणून दिली. अमरावती शहर हे ‘स्मार्ट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना कचरा उचलण्याची प्रक्रिया देखील ‘स्मार्ट’ होणे काळाची गरज असल्याचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांचे मत आहे. कचरा उचलण्यासाठी ‘ई-रिक्षा’चा वापर केला गेल्यास इंधन खर्चही लागणार नाही, हे वास्तव आहे. कमी खर्चात जास्त सेवा हे ‘ई-रिक्षा’चे वैशिष्ट्य आहे. बॅटरी चार्र्जींग करण्यासाठी १० ते १२ रुपये लागत असून ७९ ते ८० किलोमिटरपर्यत तो चालू शकते. घंटी कटल्यात कचरा गोळा केल्यानंतर तो तुंबून ओढताना सफाई कर्मचाऱ्यांची जी घालमेल होते, ती ‘ई-रिक्षा’ वापराने थांबेल, असे प्रशासनाचे म्हणने आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Now, e-rickshaw will pick up litter of garlic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.