आता ग्रा़पं़़ निवडणुकीची व्यूहरचना संगणकावर
By admin | Published: March 29, 2015 12:27 AM2015-03-29T00:27:08+5:302015-03-29T00:27:08+5:30
सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मोहन राऊ त अमरावती
सध्या जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी निवडणुकीला ३० दिवस शिल्लक असताना आपल्या गटाचा विजय व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील युवकांनी थेट संगणकावर व्यूहरचना आखली जात आहे. त्यानुषंगाने गावातील युवकांना ग्रामविकासाचा ‘मेसेज’ द्यायला सुरूवात झाली आहे़
जिल्ह्यात लोकसभा, विधानसभा तर काही तालुक्यांतील पंचायत समिती निवडणूक मागील वर्षी पार पडली. आता सहकार क्षेत्रातील निवडणुका सुरू असताना जिल्ह्यातील ५५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे़ याचा सर्वाधिक फायदा संगणकीय प्रणालीत विविध कंपन्यांनी व गावातील गटांनी घेणे सुरू केले आहे़ मोठ्या ग्रामपंचायतींच्या रहिवाशांचा मोबाईलवर अनेक मेसेज देणे सुरू केले आहे़ हा मेसेज पूर्णपणे मराठीत असल्यामुळे आपल्या गावाच्या विकासात मेसेज पाठविणाऱ्या गटाचा मोठा सहभाग असल्याचा भास आता या मतदारांना होऊ लागला आहे़ गावातील मतदारांच्या यादीप्रमाणे डाटा भरून घेतला जात आहे़
मतदाराची जात, व्यवसाय नोकरी पत्ता विशेष म्हणजे भ्रमण, दूरध्वनी क्रमांकांची नोंद या डाटात केली आहे़ याशिवाय आडनाव, घर, क्रमांक संपर्क व्यक्ती वयोमानानुसार पुरूष, स्त्री मतदारांची संख्या यात समाविष्ट आहे़
आजपर्यंत एका वॉर्डातील कुटुंबाला दुसऱ्या राजकीय गटाने किती शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला याविषयी माहिती 'अपडेट' करण्यात आली आहे़ ग्रामीण भागातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गट एकामेकासमोर उभे राहणार असले तरी आपल्या गटात किती मतदारांचा अधिक समावेश व्हावा यासाठी बेरजेचे राजकारण आतापासून खेळले जात आहे़ विशेषता: ही हायटेक प्रणाली ग्रामीण मतदारांच्या मानसिकतेमध्ये रूजली जाऊ शकते़ हा संशोधनाचा विषय असला तरी आपल्या गावाच्या विकासाचा अथवा संबंधित सरपंच व उपसरपंच यांनी पाच वर्षांत कोणतेच काम केले नाही. याचा थेट मोबाईलवर व्हाईस मेसेज तसेच लिखित संदेश मिळत असल्यामुळे या ग्रामीण भागाचे राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरूवात झाली आहे़ व्हाईस मेसेजद्वारे ग्रामस्थांना थेट गावाचा विकास किती झाला अथवा संबंधित लोकप्रतीनिधींनी विकास केला किंवा नाही याचा मेसेज पोहोचत असल्यामुळे मतदार पुढील काळात जागृत होणार आहे़ युवकांमध्ये होणारी ही संगणकीय जागृती लोकशाहीसाठी न्यायिक असल्याचे मत अंजनसिंगीच्या कार्यकर्त्या पपिता मनोहरे यांनी व्यक्त केले़