आता ‘रिमोट’वर चालणार घरातील विद्युत उपकरणे

By Admin | Published: June 1, 2017 12:09 AM2017-06-01T00:09:12+5:302017-06-01T00:09:12+5:30

आता घरातील वीज उपकरणे सुरू-बंद करण्यासाठी वारंवार उठून बोर्डावरील बटनांजवळ जाण्याची गरज राहणार नाही.

Now the electrical appliances in the house running on 'remote' | आता ‘रिमोट’वर चालणार घरातील विद्युत उपकरणे

आता ‘रिमोट’वर चालणार घरातील विद्युत उपकरणे

googlenewsNext

अमित थेरचे संशोधन : ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’चा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आता घरातील वीज उपकरणे सुरू-बंद करण्यासाठी वारंवार उठून बोर्डावरील बटनांजवळ जाण्याची गरज राहणार नाही. येथील अमिंत थेर या तरूणाने घरातील वीज उपकरणे रिमोट कन्ट्रोलवर चालणारी यंत्रणा विकसित केली आहे. रिमोट कन्ट्रोलच्या आधारे वीज उपकरणे हाताळता येणार आहेत. थेर याच्या या संशोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकवीरा विद्युत कॉलनीतील रहिवासी अमित तुळशीराम थेर याला लहानपणापासूनच निरनिराळे संशोधन करण्याचा छंद आहे. त्यामधूनच त्याने व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी पडणारे संशोधन करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु ठेवले आहेत.

कमी खर्चात युनिट
अमरावती : त्याने आता घरातील विजेची उपकरणे रिमोट कन्ट्रोलद्वारे चालणारी यंत्रणा विकसित केली आहे. घरातील विद्युत तारांच्या यंत्रणेत काही बदल करून त्यामध्ये रिमोट कन्ट्रोल युनिट लावले आहे. यायुनिटच्या माध्यमातून घरातील लाईट व फॅनसारखी उपकरणे रिमोटच्या सहाय्याने स्वतंत्रपणे सुरु व बंद करता येणार आहेत. हे युनिट रेडिओ फ्रिक्वेंसीवर काम करीत असल्यामुळे घराबाहेरून सुद्धा रिमोटद्वारे वीज उपकरणे सुरु किंवा बंद करता येतील.
हे संपूर्ण युनिट कमी खर्चात तयार होत असल्याचे अमित थेरचे म्हणणे आहे. या यंत्रणेचा "मल्टीपर्पज यूज" करता येणार आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहरात घरातील यंत्रणा स्मार्ट करण्याची संकल्पना थेर याने विकसित केली आहे. यापूर्वी थेर याने ‘शॉक सेन्सर सिस्टीम’ विकसित करून मोटरसायकल चोरीला आळा बसेल, अशी व्यवस्था केली आहे.

अपंग नागरिकांना
होईल फायदा
शारीरिकदृष्ट्या अपंग असणाऱ्या नागरिकांना ही यंत्रणा अत्यंत उपयोगी पडणार आहे. व्हील चेअरवर बसलेल्या व्यक्तिंना कोणाचीही मदत न घेता रिमोट कन्ट्रोलद्वारे वीज उपकरणे चालू किंवा बंद करता येणार आहेत.

यू-ट्युबवर पहा
अमीत थेर यांच्या संशोधनाचा व्हिडिओ यू-ट्युबवर अपलोड असून ते इंटरनेटद्वारे कोणालाही पाहता येऊ शकतात. यू-ट्युबवर अमित थेर असे सर्च केल्यास त्याच्या संशोधनाची सर्व प्रक्रिया पाहता येऊ शकते.

Web Title: Now the electrical appliances in the house running on 'remote'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.