आता लुबाडण्यासाठी ‘इमोशनल ब्लॅकमेल’

By Admin | Published: June 2, 2014 12:54 AM2014-06-02T00:54:08+5:302014-06-02T00:54:08+5:30

लोकांना फसविण्याचे एकापेक्षा एक तंत्र अवगत केलेल्या काही भामट्यांनी आता इमोशनल

Now the 'emotional blackmail' | आता लुबाडण्यासाठी ‘इमोशनल ब्लॅकमेल’

आता लुबाडण्यासाठी ‘इमोशनल ब्लॅकमेल’

googlenewsNext

अमरावती : लोकांना फसविण्याचे एकापेक्षा एक तंत्र अवगत केलेल्या काही भामट्यांनी आता इमोशनल ब्लॅकमेलिंग करून लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे. देशातील मोठमोठय़ा हॉस्पिटलमध्ये गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लहानग्यांची माहिती चोरून त्याचे मार्केटिंग करणारे रॅकेट सध्या देशात सक्रिय झाले आहे. मी नवी दिल्ली येथून बोलत असून, अमुक हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांंची चिमुरडी ब्लड कॅन्सर या भयानक आजाराने ग्रस्त आहे. तरी तुम्हाला शक्य होईल तेवढी मदत ऑनलाईन अथवा बँकेच्या माध्यमातून करू शकता असा भावूक कॉल सध्या कित्येकांच्या मोबाईलवर धडकत आहे. लोकदेखील मागचा-पुढचा विचार न करता दिलेल्या खाते क्रमांकावर रक्कम भरून पुण्य पदरात पाडून घेण्याचे समाधान मिळवतात; मात्र ती रक्कम त्या चिमुरडीला मिळत नसून दुसर्‍याच्याच खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे डोनेट करा; पण खात्री करूनच.

Web Title: Now the 'emotional blackmail'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.