आता प्रभागात प्रत्येकी दोन महिला-पुरूष उमेदवार

By Admin | Published: May 12, 2016 12:08 AM2016-05-12T00:08:36+5:302016-05-12T00:08:36+5:30

राज्यात मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये सन-२०१७ मध्ये होऊ घातलेली निवडणूक बहुसदस्यीय प्रणालीने घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्य शासनाने घेतला आहे.

Now every two men and women candidates in the division | आता प्रभागात प्रत्येकी दोन महिला-पुरूष उमेदवार

आता प्रभागात प्रत्येकी दोन महिला-पुरूष उमेदवार

googlenewsNext

महिला आरक्षण कायम : एकाच वेळी निवडणार चार नगरसेवक
अमरावती : राज्यात मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये सन-२०१७ मध्ये होऊ घातलेली निवडणूक बहुसदस्यीय प्रणालीने घेण्याचा निर्णय मंगळवारी राज्य शासनाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग असे समीकरण राहणार असून ५० टक्के महिला आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेत २२ प्रभागात सार्वत्रिक निवडणूक होण्याचे संकेत आहेत.
एप्रिल २०१६ मध्ये नगरपरिषद, महापालिका निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने घेण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाने राज्य मंत्रीमंडळासमोर आणला होता. या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी मंत्रिमंडळाची उपसमिती गठित करण्यात आली होती. यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. या समितीने महापालिका आणि नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेची शिफारस केली होती. या प्रस्तावाला मंगळवारी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यासंर्दभातील वटहुकूमही लवकरच जारी केला जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे महापालिकेतील मतदारांना एकाच वेळी चार नगरसेवक निवडता येणार आहेत. सध्या अमरावती महापालिकेत ४३ प्रभागात ८७ सदस्य संख्या आहे. मात्र, येत्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग प्रणालीने निवडणुका घेण्याचे ठरविण्यात आल्यामुळे २२ प्रभागात निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यानुसार २१ प्रभागात चार तर एका प्रभागात तीन नगरसेवक निवडीची प्रक्रिया पार पडेल. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होईल.

अपक्षांची संख्या रोडावणार
२०१७ मध्ये होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रणालीने पार पडली तर निश्चितपणे अपक्ष नगरसेवकांची संख्या रोडावणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. एका प्रभागात २५ ते २८ हजारापर्यत लोकसंख्या राहणार आहे. परिणामी प्रभागात अधिक संख्येने मतदार राहणार असल्यामुळे अपक्ष उमेदवारांना निवडणुकीत मजलगाठले कठीण होणार आहे. राजकीय पक्षासाठी बहुसदस्यीय प्रभाग प्रणाली पोषक असल्याचे दिसून येते.

Web Title: Now every two men and women candidates in the division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.