आता गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचना

By Admin | Published: June 17, 2016 11:58 PM2016-06-17T23:58:43+5:302016-06-17T23:58:43+5:30

जिल्ह्यात डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ९ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा व आरक्षणाचा कार्यक्रम गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

Now with the help of Google Maps, the ward structure | आता गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचना

आता गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचना

googlenewsNext

नऊ नगरपरिषद : आयोगाचे निर्देश, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
अमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ९ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा व आरक्षणाचा कार्यक्रम गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आता प्रभाग रचना गुगल मॅपच्या आधारे तयार करण्यात येऊन स्थानिक केबलवरून आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश आयोगाचे उपसचिव ध.मा. कानेड यांनी गुरुवारी दिले आहेत.
जिल्ह्यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, चांदूरबाजार, मोर्शी, शेंदूरजना घाट, दर्यापूर, चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे या नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आयोगाची लगबग सुरू झाली आहे. या नगरपरिषद निवडणुकांसाठी आयोगाने १९ मे २०१६ पासून बहुसदस्यीय प्रभाग प्रद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन सदस्य निवडले जाणार आहेत. राखीव जागांचे वाटप चक्रानुक्रमाने केल्या जाणार आहे. मात्र, १३ जून २०१६ च्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीमध्ये मात्र प्रभागात एकच सदस्य निवडून द्यायचा आहे. या विषयीचे आदेश आयोगने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन निवडणुका असणाऱ्या या नऊ नगरपरिषदांमध्ये प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.
आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचना करणे, हरकती व सूचनांवर सुनावणी व अंतिम प्रभागरचना असे प्रभाग रचनेचे तीन प्रमुख टप्पे आयोगाने निश्चित केले आहे. प्रभाग रचनेसाठी गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शविण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणासह प्रभाग रचनेचा प्रारुप प्रस्ताव मुख्याधिकारी तयार करणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व याच प्रवर्गातील महिला यांची सोडत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी काढणार आहे.

Web Title: Now with the help of Google Maps, the ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.