आता २०० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:16 AM2021-08-15T04:16:02+5:302021-08-15T04:16:02+5:30
इंदल चव्हाण-अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संचारबंदीत जिल्हा प्रशासनाने १५ ऑगस्टनंतर शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता लॉनमधील ...
इंदल चव्हाण-अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संचारबंदीत जिल्हा प्रशासनाने १५ ऑगस्टनंतर शिथिलता दिली आहे. त्यामुळे आता लॉनमधील लग्नसोहळ्यात २०० पाहुण्यांची उपस्थिती राहणार आहे. या निर्णयामुळे वर-वधु मंडळींना दिलासा मिळाला असून, बँड पथकांनाही यातून रोजगार प्राप्त होणार आहे.
मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने व जास्तीत जास्त १०० नागरिकांना उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी निर्देश देण्यात आले आहेत.
बॉक्स
नियमाचे उल्लंघन केल्यास दंड
सामाजिक अंतर न पाळल्यास दुकान, प्रतिष्ठाने, आस्थापनास ३५ हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई, मंगल कार्यालयत, लग्न समारंभाकरिता ५० टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास ५६० हजार रूपये दंड व फौजदारी कारवाई, विनामास्क फिरणे, गर्दी करणे,उघडयावर थु्ंकणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधितास ७५० रूपयांचा दंड व फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही आदेशाव्दारे देण्यात आला आहे.
बॉक्स
बँड पथकासह मंगल कार्यायांध्ये उत्साह
लग्न सोहळ्यात २०० जणांच्या उपस्थितीस मुभा दिल्याने मंगल कार्यालयांत लग्न सोहळा पार पडणार असल्याने त्यांच्या व्यवसायाला उभारी मिळणार असून, बँड पथकांनाही रोजगार मिळणार असल्याने या दोन्ही व्यवसायातील मंडळींमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.
या आहेत लग्न तिथी
दक्षिणायन आरंभ झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्तच नसतात. परंतु चातुर्मासात ज्यांना अत्यंत आवश्यक असेल त्यांच्यासाठी आपत्कालीन मुहुर्त म्हणून आगस्ट महिन्यात १८, २०, २१, २७, नवरात्रानंतर ऑक्टोबर महिन्यात ८, १०, ११, १२, १८, १९, २० २१ आणि २४ या तारखा लग्नासाठी शुभ असेल.
- सारंग जोशी, पंडित, रविनगर