रेल्वे गाड्यांत आता ‘लाईव्ह टीव्ही’

By admin | Published: February 25, 2017 12:14 AM2017-02-25T00:14:36+5:302017-02-25T00:14:36+5:30

रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकावर नेस्ट जनरेशन वायफाय ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Now live TV 'live TV' | रेल्वे गाड्यांत आता ‘लाईव्ह टीव्ही’

रेल्वे गाड्यांत आता ‘लाईव्ह टीव्ही’

Next

उपग्रहाची मदत : मध्य रेल्वे विभागात राबविणार प्रयोग
अमरावती : रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे गाड्या व रेल्वे स्थानकावर नेस्ट जनरेशन वायफाय ही सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासुविधेमुळे रेल्वे गाड्यात ‘लाइव्ह टिव्ही’ बघता येणार आहे. ही सुविधा सुरु करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाने पुढाकार घेतला आहे.
प्रारंभी राजधानी, दुरंतो, शताब्दी या प्रतिष्ठित रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा पुरविली जाणार आहे. त्यानंतर प्रमुख गाड्यांमध्येही हा प्रयोग सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात रेल्वे प्रवाशांना गाडीत बातम्या, चित्रपट, मालिका, क्रिकेट, संगीताचा आनंदही घेता येईल. 'लाइव्ह टिव्ही'साठी ईस्त्रो उपग्रहाची मदत घेतली जाईल. त्याकरिता लवकरच करार केला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. काळानुरुप रेल्वेकडूनही बदल अपेक्षित असल्याची प्रवाशांची मागणी आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाने ही सुविधा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याविभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याचा रेल्वे गाड्यांमध्ये ‘लाइव्ह टिव्ही’ हा उपक्रम सुरु होईल. ही सेवा शुल्क असून यातून खराब हवामान, रेल्वे थांबे, पुढे येणारे थांबे, रेल्वे स्थानकाची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. या वायफायचा स्पीड ४५ एमबीपीएस असणार आहे. परिणामी जलदरीत्या प्रवासी मोबाईलवर आवडते कार्यक्रम बघू शकणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना ‘लाइव्ह टिव्ही’ हा उपक्रम अतिशय चांगला आहे. त्यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल. बदलत्या काळानुसार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे.
- राजेश पाटील,
जनसंपर्क अधिकारी, भुसावळ रेल्वे

Web Title: Now live TV 'live TV'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.