आता विद्यापीठात राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट अवार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:08 AM2021-03-29T04:08:41+5:302021-03-29T04:08:41+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक सत्र २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट अवार्ड दिले जाणार आहे. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शैक्षणिक सत्र २०२२-२३ या वर्षात राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट अवार्ड दिले जाणार आहे. हा अवार्ड महाविद्यालयातील एनसीसी स्वंयसेवकांना बहाल केला जाणार असून, अशा प्रकारचे अवार्ड देणारे अमरावती विद्यापीठ पहिले ठरले आहे. हा प्रस्ताव अधिसभा सदस्य मनीष गवई यांनी सादर केला होता, हे विशेष.
राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) हा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयच्यावतीने देशाच्या युवा सबलीकरण, व्यक्तिमत्त्व, विकासासाठी चालविला जाणारा एक सक्रिय कार्यक्रम आहे. ज्यातून विध्यार्थ्यांना सैन्य शिस्तीचे व एकात्मतेचे धडे दिले जातात. संत गाडगे बाबा अमरावती अमरावती विद्यापीठाशी संलग्नित विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून विद्यापीठस्तरीय राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट कॅडेट अवॉर्ड सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल नामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी याबाबत सिनेट सभेत मांडला होता. या प्रस्तावाला हिरवी झेंडी देत तो मान्य केल्यामुळे गवई यांच्या अथक प्रयासाने विद्यापीठाचे राष्ट्रीय छात्र सेना बेस्ट कॅडेट अवॉर्ड सुरू होणार आहे. आता बटालियनमधून येणाऱ्या विध्यार्थ्यांला बेस्ट कॅडेट अवॉर्ड दिल्या जाणार आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयातील एनसीसीच्या स्वयंसेवकांना त्याचा लाभ मिळणार आहे.