आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 10:51 PM2018-07-08T22:51:27+5:302018-07-08T22:52:02+5:30

जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.

Now the police action is taken against Kathiwadi cattle | आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडी गुरांवर कारवाई

Next
ठळक मुद्देवनविभागाचे कठोर पाऊल : राखीव वनांत अवैध चराई रोखण्यासाठी उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जंगलाचे संरक्षण आणि राखीव वनांत काठेवाडी गुरांकडून होणारी अवैध चराई रोखण्यासाठी आता पोलीस बंदोबस्तात काठेवाडींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ंिनर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यासाठी उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी पोलीस आयुक्तांकडे बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहार चालविला आहे.
शहरानजीक राखीव वनांना काठेवाडी पशुपालक, मेंढपाळांनी लक्ष्य केले आहे. त्याचवेळी राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड उपक्रमांतर्गत या राखीव वनांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. काठेवाडी गुरांच्या चराईमुळे राखीव वनांमध्ये लावण्यात आलेल्या रोपांना हानी पोहोचत आहे तसेच राखीव वनांतील गवतदेखील काठेवाडी गुरे फस्त करीत आहेत. काठेवाडी गुरे, तर धनगर मेंढ्यांसह खासगी जागेवर राहुटी करून वास्तव्यास आहेत. यात अंजनगाव बारी, कोंडेश्वर, चिरोडी, पोहरा, बडनेरा, अमरावती व भानखेडा आदी जंगलशेजारील गावांचा समावेश आहे. गत दोन दिवसांपासून डीएफओ मीणा यांनी अवैध चराई रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी पोहरा जंगलात दोन काठेवाडी गुरे ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. मात्र, वनविभागाकडे तोकडे मनुष्यबळ असल्याने काठेवाडींना अवैध गुरे चराईपासून रोखणे हे आव्हानच आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात चराई करणाऱ्यांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला आहे. वनकर्मचारी आणि पोलीस संयुक्तपणे राखीव वनांच्या संरक्षणासाठी परिसर पिंजून काढणार आहेत.
इन कॅमेरा होणार कारवाई
राखीख वने आणि अतिसंरक्षित वनक्षेत्रात काठेवाडी गुरे आढळल्यास इन कॅमेरा कारवाई केली जाणार आहे. अगोदर ड्रोन कॅमेºयांनी अवैध चराईचे छायाचित्रण घेतले जाईल. त्यानंतर काठेवाडी गुरे, मेंढ्या ताब्यात घेऊन पशुमालकांवर वनसंवर्धन अधिनियमानुसार कारवाई केली जाणार आहे. उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षक अशी फळी अवैध चराई रोखण्यासाठी कामी लागली आहे.

राखीव वनांत काठेवाडी गुरे, मेंढ्यांच्या अवैध चराईमुळे बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील वनक्षेत्र, वनसंवर्धनाचे काय हाल झाले, हे सर्वांना माहिती आहे. रोजगार मिळविणे आणि व्यवसाय करण्यास कोणालाही मनाई नाही. मात्र, जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
- हेमंत मिणा
उपवनसंरक्षक, अमरावती.

Web Title: Now the police action is taken against Kathiwadi cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.