आता सिंचनासाठी नलिका वितरणाला प्राधान्य,  जलसंपदाच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 06:44 PM2017-10-03T18:44:13+5:302017-10-03T18:44:28+5:30

सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे.

Now the priority of tube distribution for irrigation, water resources suggestions |  आता सिंचनासाठी नलिका वितरणाला प्राधान्य,  जलसंपदाच्या सूचना

 आता सिंचनासाठी नलिका वितरणाला प्राधान्य,  जलसंपदाच्या सूचना

googlenewsNext

 अमरावती -  सूक्ष्म सिंचनास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी इष्टतम वापराचे शासन धोरण आहे. यामध्ये नलिकांद्वारे वितरण प्रणाली अभिप्रेत आहे. मात्र यापूर्वी लाभक्षेत्रात विकेंद्रित साठे निर्माण करण्यात येणार आहे. आता सिंचन प्रकल्पांच्या वितरण व्यवस्थेत नलिका वितरण प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

वितरण प्रणाली व सिंचन प्रणाली ह्या जरी दोन भिन्न बाबी असल्या तरी वितरण प्रणालीद्वारेच पाणी क्षेत्रापर्यंत पोहोचवणे त्यांनतर पाटच-या किंवा तुषार व ठिबक सिंचनाद्वारे पाणी कार्यान्वित करणे अभिप्रेत आहे. नलिका वितरण प्रणाली स्वीकारली असली तरी सिंचनाची कोणतीही पद्धती अवलंबिता येते. मात्र उपलब्ध पाणीसाठा व लागवडयोग्य क्षेत्र विचारात घेता सूक्ष्म सिंचन हेच जलसंपदा विभागाचे दूरगामी उद्दिष्ट आहे. जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लाभक्षेत्रातील जमिनीचा उतार तीव्र असल्यास कालव्यावर उपलब्ध ऊर्जेचा व्यय करण्यासाठी धबधब्याची शृंखला बांधावी लागते. यावर आगाऊ खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात नलिका वितरण प्रणाली संकल्पित करण्यास वाव आहे व सर्वसाधारणपणे जमिनीचा उतार १:५०० पेक्षा असल्यास गुरूत्वाकर्षण ऊर्जेद्वारे नलिका वितरण व्यवहार्य बाब आहे.
लाभक्षेत्रातील जमिनीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार असल्यास कालवा बांधकामाचा खर्च वाढतो व शेतच-यांवरील धबधब्याचा खर्च वाढतो अशा प्रकरणी नलिका वितरण व्यवहार्य बाब ठरणारी असल्याचे जलसंपदा विभागाच्या मार्गदर्शक सूचनामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

 
वहन व्ययाची बचत, कार्यक्षमतेमध्येही वाढ
नवीन प्रकल्पांच्या बाबतीत पांरपरिक कालवा वितरण प्रणाली भूसंपादनाच्या खर्चामुळे महाग पडू शकते, अशा प्रकरणी अभियांत्रिकी निकषानुसार नलिका वितरण प्रणाली तांत्रिक व आर्थिकदृट्या व्यवहार्य ठरणार आहे. तसेच नलिका वितरणामुळे वहन व्ययाची बचत होणार आहे व पाणी वापराची कार्यक्षमताही वाढणार आहे. काळ्या मातीच्या लाभक्षेत्रात पाया खोल जात असल्याने कालव्यावरील बांधकामाचा भांडवली खर्च जास्त येतो व अस्तरीकरणाचा खर्चही अधिक असल्याने अशा प्रदेशात तांत्रिक निकषानुसार नलिका वितरण प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Now the priority of tube distribution for irrigation, water resources suggestions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी