बंदीजनांनी साधला आप्तांसोबत ‘व्हिडीओ कॉलिंग’ने संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:25 AM2017-11-11T10:25:52+5:302017-11-11T10:28:43+5:30

येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.

Now prisoners talks with near ones through video calling | बंदीजनांनी साधला आप्तांसोबत ‘व्हिडीओ कॉलिंग’ने संवाद

बंदीजनांनी साधला आप्तांसोबत ‘व्हिडीओ कॉलिंग’ने संवाद

Next
ठळक मुद्देराज्यातील पहिला प्रयोगअमरावतीच्या खुल्या कारागृहात शुभारंभ

गणेश वासनिक ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : येथील खुले कारागृहातील बंद्यांनी शुक्रवारी आपल्या आप्तेष्टासोबत व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट संवाद साधला. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. यामध्ये बंद्यांना रक्ताच्याच नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे.
अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांच्या संकल्पनेतून राज्यात खुल्या कारागृहातील पुरुष-महिला बंद्यांसाठी नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध झाली आहे. या सुविधेला अमरावती खुले कारागृहातून शुभारंभ झाला तेव्हा श्रीकृष्ण पाचगडे व राजाभाऊ सवणे या दोन बंद्यांनी मुलांसोबत व्हिडीओ कॉलिंगने संवाद साधून गावाकडील ख्यालीखुशाली जाणून घेतली. आई, नातवंड, भाऊ कसे आहेत, हे विचारताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कारागृहातील बंदींना नातेवाइकांना भेटताना कठीण नियमावली पार करावी लागते. अशातच नातेवाईकदेखील हलाखीची परिस्थिती, लांबचा प्रवास यामुळे कारागृहापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर खुले कारागृहातील बंदीजनांना व्हिडीओ कॉलिंग ही सुविधेचा प्रारंभ केला. या अभिनव उपक्रमाबाबत कैद्यांनी कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांचे मनस्वी आभार मानले.
शुभारंभाप्रसंगी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक रमेश कांबळे, तुरूंगाधिकारी मोहन चव्हाण, वरिष्ठ तुरुंगाधकारी ए.आर. जाधव, पी.एस. भुसारे, बी.एस. सदांशिव, आर.एन. ठाकरे आदी उपस्थित होते.

खुले कारागृहातील कैद्यांसोबत रक्ताची नाती असलेल्यांनाच व्हिडीओ कॉलिंग सुविधेचा लाभ घेता येईल. प्रशासनाकडे नियमानुसार त्याची नोंद असेल. हा सर्व प्रकार आॅनलाईन राहील. वरिष्ठांना क्षणात माहिती मिळेल.
- रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

Web Title: Now prisoners talks with near ones through video calling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.