आता रेल्वे प्रवाशांना बेडरोल मिळणार एका नाविन्यपूर्ण बॅगेत
By गणेश वासनिक | Published: July 6, 2023 07:04 PM2023-07-06T19:04:17+5:302023-07-06T19:04:33+5:30
Amravati News मध्य रेल्वेने एसी कोचमधील प्रवाशांना बेडशीट आणि हॅन्ड टॉवेल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक कागदी पिशव्या बदलून इको-फ्रेंडली, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या दिमतीला आणल्या आहेत.
गणेश वासनिक
अमरावती : मध्य रेल्वेने मेसर्स आधार कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने भाडे नसलेल्या महसूलाची निर्मिती करताना प्रवाशांच्या अनुभवात बदल घडवणारा एका महत्त्वाच्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आहे. एक दूरदर्शी पाऊल म्हणून मध्य रेल्वेने एसी कोचमधील प्रवाशांना बेडशीट आणि हॅन्ड टॉवेल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक कागदी पिशव्या बदलून इको-फ्रेंडली, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या दिमतीला आणल्या आहेत.
पारंपारिकपणे, तपकिरी क्राफ्ट पेपर बॅगचा वापर रेल्वेसाठी खर्च वाढतो. तथापि, या पिशव्या काढल्यानंतर अनेकदा फाटल्या जातात. त्यामुळे कप्प्यात कचरा होतो. मेसर्स आधार कॉर्पोरेशन लिमिटेडने पारंपारिक कागदी पिशव्यांचा वापर बंद करण्याचे सूचविले आणि त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी करावे आणि त्याऐवजी प्रवाशांना दीर्घकालीन प्रवासानंतर घरी घेऊन जाणाऱ्या पर्यावरणपूरक, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या देण्याचा प्रस्ताव दिला. वापर या पिशव्या सुरुवातीला पारंपरिक क्राफ्ट कव्हर्सपेक्षा महाग असल्या तरी पुरवठादाराने त्या मध्य रेल्वेला मोफत पुरवण्याची तयारी दर्शविली. त्या बदल्यात त्यांनी या पिशव्यांवर जाहिरातींसाठी विशेष हक्क मागितले, हे विशेष.
हा अभिनव प्रस्ताव स्वीकारून मध्य रेल्वेने हा प्रकल्प प्रायोजित तत्त्वावर राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रारंभी मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांवर मेसर्स आधार कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे मध्य रेल्वेला दरवर्षी सुमारे एक कोटी बॅग पुरविण्यासह हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. या व्यवस्थेमुळे पूर्वी कागदी पिशव्या खरेदीवर खर्च होणारा वार्षिक १.५ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. शिवाय, प्रवाशांना आता गुडी बॅगमध्ये लिनेन चादरी मिळेल. ज्यामुळे त्यांचा प्रवास अनुभव वाढेल.
या उपक्रमाचे यश म्हणजे ता पिशव्या पुन्हा वापरता येण्याजोग्या असून घरी घेऊन जाणे सोईचे आहे. त्यांचा विविध प्रकारे वापर करता येवू शकेल. या सकारात्मक परिणामाबरोबरच नवीन पिशव्या सादर केल्याने रेल्वेमधील स्वच्छता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सुधारणा झाली आहे.
- ॲड. प्रवीण कस्तुरे, प्रवासी.