आता पावसामुळे कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:10 AM2021-06-26T04:10:34+5:302021-06-26T04:10:34+5:30
वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज ...
वेदना अधिक होत असल्याने रुग्ण स्वत: डॉक्टरांकडे जातो. हा प्रकार थांबविण्यासाठी पावसात भिजू नये, यामुळे अशा प्रकारच्या आजाराला सहज थांबविता येते. हा आजार म्युकरमायकोसिससारखा गंभी नसल्याचे कान, नाक, घसातज्ज्ञांनी सांगितले. मात्र, कानाच्या आतील पोकळ भागात बुरशी वाढल्यास खाज सुटते. तेव्हा कुठल्याही वस्तू कानात फिरविल्यास पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वारंवार कान फुटणाऱ्या आणि बुरशी होणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे महत्त्वाचे ठरेल.
बॉक्स
ही घ्या काळजी
पावसाळ्यात डोके ओले झाल्यानंतर कानात पाणी जाते. कानात मळ असल्याने तेथे पाणी साचते. त्यापासून बुरशी तयार होऊन दुखने वाढते. यातून पिवळसर पाणी येऊ लागते. त्यावर उपाय म्हणून ओले झालेले डोके तत्काळ पुसून काढावे.
आंघोळीदरम्यान काहींना कानात पाणी टाकण्याची सवय जडलेली असते. ती धोक्याची ठरते. नैसर्गिकरीत्या कान स्वच्छ ठेवण्यासाठी आपले अवयव सक्षम असतात. मात्र पाणी टाकल्याने कानातील मळ निघतो, हा भ्रम अनेकांच्या मनात असतो.
--
पावसाळ्यात ओलाव्याचा परिणाम
१)दोन ऋतुच्या बदलाने कानात बुरशी वाढण्याचे प्रकार घडतात. पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. यामुळे शक्यतो भिजताना कान सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्यावी. शिवाय दमा आणि सर्दीचा आजार असलेले व्यक्ती ओल्यापासून दूर रहावे. खबरदारी हाच उत्तम उपाय आहे.
२)शुगर असलेल्या व्यक्तींना बुरशीजन्य आजाराची बाधा होण्याची भीती असते. तसेच कोविडमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने अशा आजाराची लक्षण दिसू शकतात. मात्र, यात घाबरण्यासारखे काहीच नाही. सर्दीदरम्यान जोराने शिंकू नये, यामुळे कानाच्या पडद्याला धोका वाढतो.
कोट
पावसाळ्यात डोके ओले होतच असते. त्यापासून फारच तर सर्दी, पडसा होऊ शकतो. मात्र, म्युकरमायकोसिसचा धोका नाही. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र, ओले झाल्यानंतर डोक तत्काळ पुसून काढण्याची तसदी घ्यावी.
- डॉ. के.बी. देशमुख,जिल्हा सामान्य रुग्णालय
ज्यांना कानाचे आजार आहे अशांना बुरशीजन्य विकाराचा धोका असतो. मधुमेहींनाही बुरशीजन्य आजाराचा धोका असतो. कानात कापसाचे बोळे लावावे. थंड हवेपासून बचाव करावा. सर्दी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा.
- डॉ. गणेश काळे,