यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:09 AM2021-05-24T07:09:52+5:302021-05-24T07:10:34+5:30

Anathashrama News: हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

From now on, those who do not have any support will be able to stay in the orphanage till the age of 23 | यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा

यापुढे २३ व्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, आधार नसलेल्यांना मिळेल माेठा दिलासा

googlenewsNext

- गणेश वासनिक
अमरावती : अनाथ मुले १८ वर्षांची झाली की, त्यांना ते राहत असलेल्या अनाथ आश्रमात राहू दिले जात नाही. या वयात ही मुले-मुली आपल्या पायांवर उभीदेखील झालेली नसतात. यामुळे अनाथ मुला-मुलींचे वय २३  वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना आश्रमात राहता येईल, असा निर्णय राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला. हा क्रांतिकारी निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयामुळे अनाथालय संचालित करणाऱ्या चालकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

 कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल गठित करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने  घेतला आहे. राज्यात कोविडमुळे आतापर्यंत  १९५ मुले अनाथ झाली आहेत,  आई व वडील गमावलेली १०८  बालके, तर एक पालक गमावलेली ८७  बालके आहेत.

Web Title: From now on, those who do not have any support will be able to stay in the orphanage till the age of 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.