पैसेवारीत आता नवतंत्रज्ञानाचा वापर

By admin | Published: November 5, 2015 12:29 AM2015-11-05T00:29:54+5:302015-11-05T00:29:54+5:30

पीक पैसेवारीबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, याबाबत मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय व पूक पैसेवारीबाबत ...

Now the use of innovation in the money laundering | पैसेवारीत आता नवतंत्रज्ञानाचा वापर

पैसेवारीत आता नवतंत्रज्ञानाचा वापर

Next

पथदर्शी स्वरुपात राबविणार : रबीची वाट न पाहता पैसेवारी होणार जाहीर
गजानन मोहोड अमरावती
पीक पैसेवारीबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, याबाबत मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय व पूक पैसेवारीबाबत यापूर्वीचे शासन निर्णय याबाबी विचारात घेऊन यंदाच्या खरीप हंगामाची अंतिम आकडेवारी काढण्यात येणार आहे. यामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने पैसेवारी घोषित करण्याबाबत दोन पध्दतीने पथदर्शी प्रकल्प राबवून शास्त्रोक्त पध्दतीने अंतिम पैसेवारी घोषित केली जाईल.
यापूर्वीच्या पैसेवारी काढण्याच्या पध्दतीत बदल करण्याबाबत विधीमंडळामध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आणेवारीच्या पध्दतीचा अभ्यास करुन यामध्ये बदल करणे आवश्यक आहे काय? तसेच या संदर्भात शिफारस करण्यासाठी केंद्राच्या धोरणाच्या अनुषंगाने ६ एप्रिल रोजी शासनाने विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. या समितीच्या १० बैठकी झाल्यात तसेच अन्य राज्याच्या पैसेवारीबाबत समितीच्या सदस्यांनी कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरात आदी राज्याच्या पीक पैसेवारीबाबत केलेला अभ्यास याविषयीचा सविस्तर अहवाल समितीने २३ जुलै २०१५ रोजी शासनास सादर केला. समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळ उपसमिती व मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होवून पीक पैसेवारीबाबत समितीच्या अहवालातील शिफारसी शासनाने स्वीकारल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आदी सर्वसमकक्ष खरीप पिकांची आणेवारी काढण्याचा निर्णयशासनाने या आठवड्यात घेतला. या निर्णयानुसार अमरावती व नागपूर विभागातील प्रचलीत पैसेवारी पध्दतीनुसार हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबरला व सुधारीत पैसेवारी १५ नोव्हेंबरला व अंतिम पैसेवारी १५ जानेवारीला जाहीर केली आहे. तसेच सुधारीत पध्दतीनुसार हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबरला, सुधारीत पैसेवारी ३१ आॅक्टोबरला व अंतिम पैसेवारी ही ३१ डिसेंबरला जाहीर करण्यात येईर्ल.$ि जिल्हाधिकारी यांचेव्दारा दरवर्षी १५ आॅगस्टपूर्वी ग्राम पैसेवारी समिती गठीत करावी लागणार आहे.

Web Title: Now the use of innovation in the money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.