आता वीकएंड घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:51+5:302021-06-28T04:09:51+5:30

असाईनमेंट प्रदीप भाकरे अमरावती : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकएंड हॉटेलिंग पुन्हा ...

Now the weekend is at home! | आता वीकएंड घरातच!

आता वीकएंड घरातच!

Next

असाईनमेंट

प्रदीप भाकरे

अमरावती : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे वीकएंड हॉटेलिंग पुन्हा बंद झाली आहे. पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरी सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी २६ जून रोजी संचारबंदी कालावधीतील निर्बंध जाहीर करणारे आदेश पारित केले. हे प्रतिबंधात्मक आदेश २८ जून रोजी सकाळी ७ पासून अंमलात येणार आहेत. त्यात पुन्हा हॉटेलच्या वेळेला मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

बॉक्स

सोमवार ते शुक्रवार ५० आसनटक्के क्षमतेने सुरू राहणार हॉटेल

१) सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नियमित.

२) सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ ते रात्री ८ घरपोच सेवा.

३) शनिवार व रविवार सकाळी ७ ते रात्री ८ घरपोच सेवा.

४) हॉटेल, लॉजिंग, रेस्टाॅरेंटमध्ये एकूण क्षमतेच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने निवास करता येणार.

----------------------

हॉटेल कर्मचाऱ्यांचे आणखी हाल

‘हॉटेल बंद असल्याने मागील वर्ष अत्यंत हलाखीचे गेले. हॉटेलमध्ये ग्राहक येतील तेव्हा व्यवसाय होईल. त्यावेळी आमचा खर्च मालकांना परवडेल. यंदा दोन महिन्यांपासून हॉटेल सुरू झाले असले तरी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे.

- हॉटेल कर्मचारी

---------------

गतवर्षी हॉटेल पूर्णत: बंद, तर यंदा होम डिलिव्हरी. हॉटेलमध्ये जसे ग्राहक येतात, तशा होम डिलिव्हरीच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणात येत नाहीत. आल्या तरी जेवण बनविणाऱ्या व पोहचवून देणाऱ्याच्या हातालाच काम. वेटर तर पार बुडाले. आता पुन्हा काम मिळेल, हीदेखील शाश्वती नाही.

- हॉटेल कर्मचारी

--------------

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?

‘कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, संचारबंदी अशा नानाविध संकटांचा सर्वाधिक फटका बसला, तो हॉटेल संचालकांना. त्यातही तालुकास्तरावरील हॉटेल व्यावसायिक पार बुडाले. मोठ्या शहरात होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर मिळतात, पण आम्ही तर पुरते मेलो.

- बिट्टू अकोलकर, हॉटेल व्यावसायिक, चांदूर बाजार

---------------

नवी पहाट म्हणून पुन्हा कामाला लागलो. गावखेड्यात परतलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. मात्र, आता पुन्हा नव्याने मर्यादा घालण्यात आल्या. त्याचा परिणाम व्यवसायावर होईल. पण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी मर्यादादेखील आवश्यकच आहेत.

- रवींद्रसिंग सलुजा, हॉटेल व्यावसायिक, अमरावती

--------------------

Web Title: Now the weekend is at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.