अमरावती विद्यापीठात विद्यार्थ्यांचा जोरदार राडा; उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची एनएसयुआयची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 02:15 PM2022-05-06T14:15:14+5:302022-05-06T14:35:09+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ऑनलाईन परीक्षेसाठी एनएसयूआयचा मोर्चा, प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांची उपस्थिती
अमरावती : उन्हाळी परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (दि.) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एनएसयूआयने ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान संतप्त विद्यार्थी व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली व एकच गोंधळ उडाला.
विद्यापीठात काँग्रेस प्रणित एनएसयुआयने शुक्रवारी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी भव्य आंदोलन पुकारण्यात आले होते. उन्हाळी परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. मात्र यावेळी एनएसयुआयचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले, त्यांनी नारेबाजी करत विद्यापीठात पत्रक फेकली. विद्यापिठाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली.
अनेक विद्यार्थी पोलिसांच्या अंगावर चालून गेल्याने विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटपट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विद्यापीठ विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सध्या परिसरात तणावपूर्ण वातावरण असून एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख व पालकमंत्री यशोमती ठाकुर यांची कन्या आकांशा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.