कोरोना चाचण्यांची संख्या दोन लाख क्राॅस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:25 AM2021-02-21T04:25:03+5:302021-02-21T04:25:03+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या ३२८ दिवसांत एकूण २,०३,६६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अलीकडच्या आठ दिवसांत १७,३४५ ...

The number of corona tests is two million crosses | कोरोना चाचण्यांची संख्या दोन लाख क्राॅस

कोरोना चाचण्यांची संख्या दोन लाख क्राॅस

googlenewsNext

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या आतापर्यंतच्या ३२८ दिवसांत एकूण २,०३,६६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अलीकडच्या आठ दिवसांत १७,३४५ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये तब्बल ४,३३६ नमुने पॉझिटिव्ह असल्याची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे पार्श्वभूमीवर चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असली तरी त्यापूर्वी जिल्ह्यातील चाचण्यांची दररोजची संख्या ५०० ते ७०० च्या सुमारास होती. या आठवड्यात मात्र दररोज दीड ते दोन हजार दरम्यान चाचण्या होत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमितांच्या संख्येतही भर पडत आहे. चाचण्यांमधून संक्रमणाचा दर २८ टक्के असल्याचे पुढे आले.

राज्याच्या आरोग्य विभागाने ७० टक्के चाचण्या आरटी-पीसीआर व ३० टक्के रॅपिड अ‍ॅन्टिजेनद्वारे करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार आता आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लॅबमध्येच फक्त आरटी-पीसीआरद्वारे नमुन्यांची तपासणी होते. त्यामुळे तेथील तंत्रज्ञांवरही ताण येत आहे.

अलीकडे नागरिकांची बेफिकिरीदेखील वाढलेली असल्याने कोरोनाचा संसर्गात वाढ झाली आहे. मास्क बंधनकारक असताना व पथकांद्वारे कारवाया होत असतानाही मास्क बहुतांश नागरिकांच्या हनुुवटीवर असतो. लग्नकार्यामध्ये शेकडोंची गर्दी उसळत आहे. काही कार्यालये, लॉनवर पथकांद्वारे कारवाई करण्यात आली असली तरी गर्दीवर परिणाम झालेला नाही. दुकाने, मॉलमध्ये तोबा गर्दी आहे. परिणामी संसर्ग वाढला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असण्याची शक्यता आता वर्तविली जात आहे.

बॉक्स

‘सीएमओ’ची गंभीर दखल

अमरावती जिल्ह्यातील वाढत्या संसर्गाची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या तीन सदस्यीय पथकाने जिल्हा दौरा केला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आले व शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष सल्लागारांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन चाचण्या वाढविण्याचा सल्ला दिला आहे.

बॉक्स

अद्याप ७९० नमुने तपासणी प्रलंबित

२४ तासांत २,७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असली तरी अद्याप ७९० नमुने तपासणी प्रलंबित आहेत. आतापर्यंत २२,०३,६६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मंगळवारपर्यंत २७,९०१ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १,७४,५३५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. २५ हजारांवर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बॉक्स

या आठवड्यातील चाचण्यांची स्थिती

दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह टक्केवारी

१९ फेब्रुवारी२७४० ५४८ २०.००

१८ फेब्रुवारी १७९९ ३९७ २२.०६

१७ फेबुवारी १५४५ ४९८ ३२.२३

१६ फेब्रुवारी१७१० ४८५ २८.३६

१५ फेब्रुवारी२४०६ ४४९ १८.६६

१४ फेब्रुवारी२२६५ ३९९ १७.६१

१३ फेब्रुवारी११३४ ३७६ ३३.१५

१२ फेब्रुवारी११४२ ३६९ ३२.११

११ फेब्रुवारी१२५१ ३१५ २५.१७

१० फेब्रुवारी१३९३ ३५९ २५.५५

Web Title: The number of corona tests is two million crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.