१४८ शाळांची पटसंख्या दहाच्या आतच; १ ते ३ विद्यार्थी संख्या असलेल्या २२ शाळा

By जितेंद्र दखने | Published: August 25, 2023 07:31 PM2023-08-25T19:31:32+5:302023-08-25T19:31:47+5:30

प्रसाधनगृहांसह, खेळांच्या मैदानांचीही उणीव आहे. इतर आवश्यक सुविधाही नाहीत.

Number of 148 schools within 10; 22 schools with 1 to 3 student population | १४८ शाळांची पटसंख्या दहाच्या आतच; १ ते ३ विद्यार्थी संख्या असलेल्या २२ शाळा

१४८ शाळांची पटसंख्या दहाच्या आतच; १ ते ३ विद्यार्थी संख्या असलेल्या २२ शाळा

googlenewsNext

अमरावती - शैक्षणिक, भौतिक, क्रीडा, कला व इतर आधुनिक सुविधा तसेच शिक्षकांचा अभाव, घसरत चाललेली गुणवत्ता आदी बाबींनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. १ ते ३ पटसंख्येच्या २२ तसेच ४ ते १० पटसंख्या असलेल्या १२७ शाळा जिल्ह्यात आहेत.राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारी मोफत पुस्तके, गणवेश, मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, मोफत प्रवास या बाबींचा लाभ घेण्याऐवजी पैसे खर्च करून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या १४ तालुक्यात सुमारे १ हजार ५८६ शाळा आहेत. यापैकी १४८ शाळांची पटसंख्या ही १ ते १० च्या आत आहे.

झेडपी शाळांमध्ये पटसंख्या घटण्याची कारणे
इमारती जुन्या व शिकस्त आहेत. वर्गखोल्या, बसण्याची चांगली व्यवस्था नाही. अशा शाळांमध्ये पाल्याला पाठवण्यास पालक धजावत नाहीत. प्रसाधनगृहांसह, खेळांच्या मैदानांचीही उणीव आहे. इतर आवश्यक सुविधाही नाहीत. यामुळे पाल्याचे भविष्य उज्वल होणार नसल्याची पालकांची धारणा होत चालली आहे.खासगी शाळांचे प्रस्थ वाढल्यामुळे पालकांचा तिकडे ओढा अधिक वाढला आहे. 

तालुकानिहाय १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा
अचलपूर - ०८
अमरावती - १३
अंजनगाव सुर्जी - २२
भातकुली - २०
चांदूर बाजार - ११
चांदूर रेल्वे - ०८
चिखलदरा - ०५
दर्यापूर - २२
धामणगाव रेल्वे - ०५
धारणी - ०१
मोर्शी - ०५
नांदगाव खंडेश्वर - ०९
तिवसा - ०८
वरूड - ११
एकूण - १४८
कोट

जिल्हा परिषदेच्या या शाळांची पटसंख्या कमी आहे, त्यापैकी बहुतांश शहराजवळ गैरआदिवासी भागात आहेत. मेळघाटात कमी प्रमाण आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.- बुद्धभूषण सोनोने, शिक्षणाधिकारी,

Web Title: Number of 148 schools within 10; 22 schools with 1 to 3 student population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.