चाचण्यांची संख्या एक लाखाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2020 05:00 AM2020-11-01T05:00:00+5:302020-11-01T05:00:32+5:30
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथील ह्यएम्सह्णच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने तपासणीला पाठिवण्यात येत असे व त्यांचा अहवाल तिसऱ्या दिवशी मिळत होता. त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्येही नमुने तपासणीला पाठविण्यात येत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे सात महिन्यांत ९८,७०७ नमुने तपासणी करण्यात आली. त्यात १६,३०२ अहवाल पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण १७ टक्के असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याचे स्पष्ट होते. अशीच स्थिती राहिल्यास दिवाळीनंतर कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथील ह्यएम्सह्णच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुने तपासणीला पाठिवण्यात येत असे व त्यांचा अहवाल तिसऱ्या दिवशी मिळत होता. त्यानंतर सेवाग्राम व अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॅबमध्येही नमुने तपासणीला पाठविण्यात येत होते. जुलै महिन्यापासून अमरावती विद्यापीठाची प्रयोगशाळा सुरू झाल्याने येथेच रोज ५०० नमुन्यांची तपासणी होऊ लागली. ऑगस्ट महिन्यात रॅपिड ॲन्टिजन कीटद्वारेही नमुन्यांची तपासणी करयात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ९८,७०७ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात ८१,९६४ नमुने निगेटिव्ह आले. शुक्रवारपर्यंत १६,३०२ नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
लक्षणेविरहीत किंवा सौम्य लक्षणांची रुग्णसंख्या अधिक असल्याने आतापर्यंत १५,२७८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यात डिस्चार्जचे प्रमाण उच्चांकी ९४ टक्के असल्याने दिलासा मिळाला आहे.
४८ रुग्ण आयसोलेशन वॉर्डांत
जिल्ह्यात सद्यस्थितीत ६७३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३७२ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तर ४८ रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्हच्या संपर्कात असलेल्या ११४८ व्यक्तींना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकूण दाखल ३०१ रुग्णापैकी ४५ रुग्णांची प्रकृती सामान्य व ५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले, तर उपचारानंतर बरे वाटल्याने ११८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.
विद्यापीठ लॅब अहवालात ९,२०९ पॉझिटिव्ह
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत आतापर्यंत ४८,२६२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. याध्ये ९,२०९ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. ३८,६७३ निगेटिव्ह, तर २५३ प्रतीक्षेत आहेत. याशिवाय पीडीएमसी लॅबमध्ये ४,०११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १,३३३ पॉझिटिव्ह, तर खासगी लॅबमध्ये ४,००७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात १०२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय रॅपिड ॲन्टिजनचे ४१,५६० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ४८३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.