रेल्वेची संख्या वाढली; थांबे मात्र वाढेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 AM2021-07-30T04:13:02+5:302021-07-30T04:13:02+5:30
सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू? अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक ...
सामान्य प्रवाशांना आर्थिक फटका, पॅसेंजर गाड्या केव्हा होणार सुरू?
अमरावती : कोरोनाकाळात रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्यामुळे याचा आर्थिक फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच काही विशेष, एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या रेल्वे गाड्यांना ठराविक स्थानकावर थांबे देण्यात आल्यामुळे सामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास दुर्लभ झाला आहे.
गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचे आगमन होताच मोजक्याच रेल्वे सुरू होत्या. पॅसेंजर गाड्या तेव्हापासून बंद असून, आजतागायत रुळावर त्या धावल्या नाहीत. गरीब, सामान्य प्रवाशांनी शटल अथवा पॅंसेजर गाड्या सुरू कराव्यात, अशी असली तरी कोरोनाचे भय कायम असल्याने मोजक्याच रेल्वे धावत आहेत. लहान-सहान रेल्वे स्थानकावर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे नसल्याने ही रेल्वे स्थानके आता ओस पडू लागली आहेत.
---------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
- अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
- अमरावती-तिरूपती, पुणे
- नरखेड-सिकंदराबाद
- सिकंदराबाद-जयपूर
- हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गितांजली
- गाेंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
--------------------
कोट
वरिष्ठांकडून पॅसेंजर अथवा शटल रेल्वे सुरू करण्याबाबत पत्र प्राप्त नाही. पॅसेंजर रेल्वे सुरू होतील, अशी केवळ चर्चा आहे. मात्र, बोर्डाकडून अधिकृत जाहीर झाल्यानंतरच त्या सुरू होतील.
- महेंद्र लोहकरे, स्टेशन प्रबंधक, अमरावती
-----------------
या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?
टिमटाळा, मालखेड, दीपोरी
कुरूम, माना, येऊलखेड,
गायगाव, पारस, नागझिरी
----------------
थांबा नसल्याने आम्हाला होतोय त्रास....
‘‘ हल्ली केवळ मेल, एक्सप्रेस रेल्वे सुरु आहे. या गाड्यांना छोट्या स्थानकावर थांबे नाहीत. त्यामुळे गावाहून शहर गाठायचे म्हटले की, बस अथवा खासगी वाहनांनीच येे-जा करावी लागते. हा प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही.
- कमलेश नाईक, माना
--------------
काेट
टिमटाळा येथून बडनेरा ये-जा करण्यासाठी केवळ १० रुपयांत रेल्वेचा प्रवास हाेेतो. मात्र, कोरोनाकाळात रोजगार नाही. तरीही कामकाजानिमित्त बडनेरा शहरात ये-जा करावी लागते. आता बस किंवा ऑटोरिक्षाने प्रवास करावा लागताे. त्यामुळे प्रत्येक फेरीत ६० रुपये खर्च येतो.
- माधुरी नागपुरे, टिमटाळा.