नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांनी केले उपोषण

By admin | Published: November 13, 2015 12:28 AM2015-11-13T00:28:50+5:302015-11-13T00:28:50+5:30

चांदूरबाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथील नापिकीने हैराण झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दीपावलीच्या एक दिवस आधी गावात एक दिवसीय उपोषण करून त्यांच्या वेदना व्यक्त केल्यात.

Nuphikya has made havoc farmers fast-growing | नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांनी केले उपोषण

नापिकीने हवालदिल शेतकऱ्यांनी केले उपोषण

Next


बेलोरा : चांदूरबाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथील नापिकीने हैराण झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी दीपावलीच्या एक दिवस आधी गावात एक दिवसीय उपोषण करून त्यांच्या वेदना व्यक्त केल्यात.
आंदोलनाचे नेतृत्त्व प्रकाश साबळे यांनी केले. या आंदोलनात चिंचोली येथील सरपंच अतुल काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुरेश विधाते, युवक नेते भाई देशमुख, भय्यासाहेब काळे, शिरजगाव बंडचे उपससरपंच मंगेश् लेंडे, मंगेश् देश्मुख, अनी उल्ला खान, शशीकांत बोंडे दत्ता किटुकले, राहुल तायडे, किशोर अब्रुक, नीलेश देशमुख, अनिकेत ढेंगळे, विकास सोनार, शुभम सपाटे आदींचा सहभाग होता. या एक दिवसीय उपोषणात आसपासच्या गावातील तब्बल ७०० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आणि पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचा अर्ज भरून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Nuphikya has made havoc farmers fast-growing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.