पेरणीला पोषक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:41 PM2019-06-30T22:41:11+5:302019-06-30T22:41:33+5:30
जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.
जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.
अमरावती : जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याचे कृषीतज्ज्ञांनी सांगितले. यंदाच्या हंगामात मान्सूनचा पाऊस प्रथमच सार्वत्रिक झाल्याने शेतशिवारात मशागत अन् पेरण्यांची लगबग सुरू आहे.
यंदा रोहिनी अन् मृग नक्षत्र कोरडे गेल्याने मशागतीसह पेरणीची कामे ठप्प झाली होती. खरिपाच्या पेरणीला किमान ८० ते १०० मिमी पावसाची आवश्यकता आहे. जिल्ह्यात तूर्तास सरासरी ८१ मिमी पाऊस झाला. त्याहीपेक्षा बदलत्या हवामान स्थितीमुळे आगामी चार ते पाच दिवस जोरदार व काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ही खरिपाच्या पेरणीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती जिल्ह्याच्या कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. सद्यस्थितीत केवळ पाच टक्के क्षेत्रात पेरणी आटोपली. २३ तारखेला जिल्ह्यात मान्सूनची पावसाच्या नोंद झाली. मात्र, त्यानंतर पावसात खंड राहिल्याने खरिपाच्या पेरणी थबकल्या होत्या. आता मान्सून सक्रिय होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कृषी तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या आठवड्यापर्यंत मूग व उडदाची पेरणी करावयास हरकत नाही. मात्र, त्यानंतर शक्यतोवर ही पेरणी करू नये, अन्यथा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीनचे ३,२३,३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असले तरी हे क्षेत्र कमी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा साधारणपणे दोन लाख ९५ हजार क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होण्याची संभावना आहे. आता सार्वत्रिक पाऊस होत असल्याने बियाणे बाजारातदेखील लगबग वाढली आहे.
३० जूनपर्यंत ८१ मिमी पाऊस
जिल्ह्यात १ ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ८१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अमरावती तालुक्यात १०४ मिमी, भातकुली ६८, नांदगाव खंडेश्वर ९१, चांदूर रेल्वे १०४.५, धामणगाव रेल्वे ११२.५, तिवसा ५०, मोर्शी ५५, अचलपूर ६५, चांदूरबाजार ६४, दर्यापूर ७१, अंजनगाव सुर्जी ४८, धारणी १२७ व चिखलदरा तालुक्यात १२१ मिमी पावसाची नोंद झाली. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९५.२ मिमी पावसाची नोंद होती. प्रत्यक्षात १४६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित आहे.ं
विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे सक्रिय आहेत. रविवारी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांत वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ पश्चिमेला सरकणार असल्याने पुढील चार ते पाच दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक व हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.