येवदा येथे पोषण अभियान जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:15 AM2021-09-22T04:15:42+5:302021-09-22T04:15:42+5:30
फोटो - मानकर २१ पी दर्यापूर : महिला व बाल विकास विभाग तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवदा ...
फोटो - मानकर २१ पी
दर्यापूर : महिला व बाल विकास विभाग तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवदा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे पोषण अभियान जनजागृती व गरोदर माता तपासणी शिबिर सोमवारी पार पडले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रशांत आढाऊ, चंद्रकला खेडकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. आरोग्य व पोषण याविषयी सर्वांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळी अंगणवाडी सेविकांनी विविध पाककृतींचे प्रदर्शन मांडले होते. कार्यक्रमाला सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, येवदा बीट व वडनेरगंगाई बीट, मदतनीस व गरोदर माता हजर होत्या. गरोदर मातांची तपासणी डॉ. वरोकार व डॉ. कल्पना राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडकर यांनी केले. संचालन अर्चना फलके यांनी केले. आभार प्रदर्शन आशा टेहरे यांनी केले.
210921\1519-img-20210921-wa0017.jpg
येवदा येथे पोषण अभियान जनजागृती व गरोदरमाता तपासणी शिबीर संपन्न..