टाकरखेडा संभू येथे पोषण रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:11 AM2021-09-25T04:11:59+5:302021-09-25T04:11:59+5:30
टाकरखेडा संभू : जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण महिना राबविला जात असताना भातकुली तालुक्यातील ...
टाकरखेडा संभू : जिल्ह्यात १ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण महिना राबविला जात असताना भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथे कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करीत गावातुन पोषण रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
टाकरखेडा संभू अंगणवाडी केंद्रात पोषण महाअभियांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये लोकप्रतिनिधी दिन, साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून येथील सरपंच रश्मी देशमुख, सदस्य सुप्रिया बांबोळे, दिलीप मसके, प्रीती पाटील, पर्यवेक्षिका अर्चना काळे व सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. संचालन जयश्री गोमासे यांनी केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्चना काळे यांनी पोषण महिना राबवण्याची गरज का आहे, दररोजच्या आहारात पोषण घटकाचे महत्त्व, पोषण आहार सकस आहार इत्यादी बद्दल माहिती दिली. यावेली अंगणवाडी सेविका जयश्री गोमासे, माया शेंडे, वेणू अडिवकर, रेहाना बेगम, (मदनिस) मंगला लाडे, शिला पाठक, कोकीळा सरोदे, वंदना औंधकर आदी उपस्थित होते.