ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित, सहा जिल्ह्यातील निवडणुका पुढे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:18 AM2021-09-16T04:18:05+5:302021-09-16T04:18:05+5:30
( फोटो आहे. ) अमरावती : धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ...
( फोटो आहे. )
अमरावती : धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता, तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती, असा आरोप करीत ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सहा जिल्ह्यातील जाहीर केलेल्या निवडणुका पुढे घ्यावे, या मागणीचे निवेदन भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांच्या नेतृत्वात भातकुली तालुका अध्यक्ष विकास देशमुख यांनी भातकुली तहसीलदारांमार्फत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले.
बुधवारी सदर निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाच्यावतीने यावेळी महाविकास आघाडी शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य रविराज देशमुख, भाजप भातुकली तालुका अध्यक्ष विकास देशमुख, बाळासाहेब भतभुजे, सुभाष श्रीखंडे, धनुभाऊ ओलीवकर, योगेश उघडे, विलास विधे यांच्यासह अनेक कार्यकर्यांची उपस्थिती होती.